Pratapgad News: साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात बुधवारी रात्रीपासून दाखल झाले होते. पहाटे ही सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली. सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली.

‘नाद नाही करायचा, राज्यात आता…’, अफजलखानाच्या कबरीजवळील बांधकामावर कारवाई करताच नितेश राणेंचं ट्वीट

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

प्रतापगड, महाबळेश्वर,वाई, कराड, सातारा येथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील चौधरी आदी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. माध्यम प्रतिनिधींना परीसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

“भाजपाकडून अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न”, कबरीवरून काँग्रेस प्रवक्त्याची टीका; म्हणाले, “अनधिकृत बांधकामं…”

अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली आहे.

पाहा व्हिडीओ –

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीशेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात येत होते. तेथे उरूसही भरविण्यास सुरवात झाली होती. तेथील उदात्तीकरण रोखण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या या परिसरात जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आली होती.

आज पहाटे तारखेप्रमाणे आलेल्या शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीलगतचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे.