Imtiyaz Jaleel महाराष्ट्रात एमआयएमला मानणारा मोठा वर्ग आहे. आमची महाविकास आघाडीबरोबर येण्याची इच्छा आहे असं माजी खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. तसंच मी त्यांना म्हणजेच महाविकास आघाडीला सांगू इच्छितो की मला उद्या बोलवा मी उद्या मुंबईत यायला तयार आहे असंही इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता विचारधारा राहिलेली नाही ते नवे सेक्युलरवादी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. राजकारणात आता कुठलीही विचारधारा राहिलेली नाही राजकारणात आता विचारधारा राहिली नाही. आता कुठलीही गॅरंटी देता येत नाही की निवडणूक झाल्यावर शरद पवार महाविकास आघाडी बरोबर राहतील का? किंवा अजित पवार महायुती बरोबर राहतील का? ते महाविकास आघाडी बरोबरही येऊ शकतात. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर ते काय भूमिका घेतील? असे सगळे प्रश्न आहेत. आता तीन पक्षांच्या आघाडी आहे पण तिघांकडे खंजीर तयार आहे निवडणूक होऊ द्या ते एकमेकांच्या पाठीत खुपसण्यासाठी वाट बघणार नाहीत. असं मत इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी व्यक्त केलं आहे. हे पण वाचा- Prithviraj Chavan : “सहानुभूतीचा विषय संपला, दिल्ली दौरा केला तरीही..”; पृथ्वीराज चव्हाण यांचं उद्धव ठाकरेंबाबत वक्तव्य उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले इम्तियाज जलील? उद्धव ठाकरेंकडे आता कुठली आयडीयोलॉजी राहिली आहे ? ज्यांचा जन्म काँग्रेसला विरोध करण्यासाठी झाला. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष उभा केला मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी, त्याआधी दक्षिण भारतीयांना टार्गेट करण्यासाठी केला होता. तसंच काँग्रेसच्या विरोधात त्यांनी शिवसेना उभी केली. मुस्लिमांच्या विरोधात शिवसेना होती. आता तर मुस्लिम समाजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करतो आहे. कारण तुम्ही विचारधारा सोडली. नव्या विचारधारेप्रमाणे तुम्हाला मतं चालतात पण मग इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) का चालत नाही? असा सवाल जलील यांनी विचारला आहे. वक्फ बोर्डावरुनही उद्धव ठाकरेंना टोला इम्तियाज जलील यांनी आज छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला देशभरात आणि महाराष्ट्रात मुस्लिमांनी मतदान केलं. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला मतदान झालं. लोकसभेला जशी मतं मिळाली त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेतही चित्र दिसणार आहे. पण आम्हाला बरोबर घ्या असं आवाहन मी करतो आहे असंही जलील म्हणाले. विशाळगडावर जे काही घडलं त्यानंतर लोक आता पुढे निर्णय घेतील असंही मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं. वक्फ बोर्डावर तुमचे खासदार निघून गेल्याचं आम्ही पाहिलं तिथे उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती असंही जलील यांनी म्हटलं आहे.