“इम्तियाज जलील यांच्यामुळे दंगल झाली”, कराड-खैरेंच्या आरोपांना जलील यांचं उत्तर म्हणाले, “मी स्वतः…”

किराडपुरा भागात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

chandrakant khaire vs Imtiyaz Jaleel
इम्तियाज जलील यांच्यामुळे दंगल झाली असल्याचा आरोप भाजपा नेते करत आहेत. (PC : Twitter/@iamzzeeshan)

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रात्री झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेमुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पार्टी, एआयएमआयएम, शिवसेना (ठाकरे गट) पक्षांचे नेते एकमेंकांवर आरोप करत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला आहे की, या सर्व घटनेचे मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच एमआयएम पार्टी हीदेखील यामागे असून एमआयएम भाजपाची बी टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय वित्त राज्यमंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी देखील इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

दरम्यान, आपल्यावर होत असलेले आरोप एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी फेटाळले आहेत. तसेच ते म्हणाले की, हे सर्व लोक सॉफ्ट टार्गेट शोधत आहेत. आपले दोष लपवण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काह वाईट घडलं की, आमच्याकडे बोट दाखवलं जातं आणि काही चांगलं घडलं की ते त्यांच्यामुळे घडलं असं सांगतात.

हे ही वाचा >> “माझ्यावरही दगडफेक झाली”, इम्तियाज जलील यांनी सांगितली आपबिती, म्हणाले, “पोलिसांना…”

“या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा”

इम्तियाज जलील म्हणाले की, एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा मी मागणी करतो की, या घटनेचा तपास करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी नेमा. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा. कारण सत्य बाहेर येण्याची आवश्यकता आहे. काही समाजकंटकामुळे शहर वेठीस धरलं जात आहे जे चुकीचं आहे. चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करा. कुठल्याही नेत्याच्या आरोपावर मी सध्या उत्तर देणार नाही. सरकारने चौकशी समिती नेमावी, त्यातून सत्य बाहेर येईलच.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 14:26 IST
Next Story
“संभाजीनगरच्या घटनेचे देवेंद्र फडणवीस मास्टमारईंड”, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “एमआयएम…”
Exit mobile version