अलिबाग: मुंबईतील रिझवी महाविद्यालयातील वर्षासहलीसाठी आलेल्या ४ विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील वावर्ले येथे असलेल्या छोट्या धरणात ही घटना घडली. रिझवी कॉलेजमधील ३७ विद्यार्थी खालापूर तालुक्यातील सोंडई येथे ट्रेकींगसाठी आले होते. ज्यात १७ मुलींचाही समावेश होता. ट्रेकींग आटोपल्यानंतर सर्वजण धावडी नदीवर असलेल्या छोट्या बंधाऱ्यावरील सांडव्यात डुंबण्यासाठी उतरले. मात्र वर्षासहलीचा आनंद लुटत असतांना यातील चार जण बुडाले.

हेही वाचा : सांगली: प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Atal Setu cracks Nana Patole
पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या १८ हजार कोटींच्या अटल सेतूला तडे; नाना पटोलेंनी समोर आणली दुरवस्था

घटनेची माहिती मिळताच, खालापूर पोलिसांनी स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने शोध व बचाव कार्य सुरू केले. बचाव पथकांनी बेपत्ता असलेल्या चौघांचा शोध घेऊन बाहेर काढले. मात्र चौघांचाही मृत्यू झाला होता. एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने आणि रणत बंडा अशी चौघांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह चौक येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस आणि आरोग्य विभागा मार्फत केली जात आहे.