बीड: तीन मित्रांनी हॉटेलवर जेवण केले, वेटरला बिल ऑनलाइन देतो स्कॅनर घेऊन ये म्हणत गाडीत जाऊन बसले. त्यानंतर बिलाची मागणी करत गाडीजवळ आलेल्या वेटरला, बिल देण्यास नकार देत एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेण्यात आले. ऐवढेच नाहीतर त्यांनी वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले. घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत समोर आलीय.

मेहकर – पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेल मध्ये सखाराम मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी तेथे येथेच्छ जेवण केले. त्यानंतर वेटर शेख साहिल अनुसूद्दीनला बिल घेऊन ये असं सांगितले. वेटरने बिल दिल्यानंतर, फोन पेचे स्कॅनर घेऊन ये म्हणत तिघेजण गाडीत जाऊन बसले.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “साडेपाच वर्ष…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Sanjay Raut
Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटची बिले आढळली”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाने हिंदुत्व..”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Sushma Andhare on Sanket Bawankule Nagpur car accident
Sanket Bawankule Nagpur Accident: ‘अपघातानंतर संकेत बावनकुळेला प्रत्यक्षदर्शींनी चोप दिला’, सुषमा अंधारेंनी केले अनेक धक्कादायक आरोप
Python
Python in Chandrapur : बटाटाच्या पेटीत वेटोळे घालून बसला होता भलामोठा अजगर, कर्मचाऱ्याने पेटी उघडताच…
anesh visarjan and paigambar jayanti miraj
सांगली : मिरजेत पैगंबर जयंतीची मिरवणूक लांबणीवर, गणेशोत्सव – पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने निर्णय

हे ही वाचा…Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटचं बिलं आढळलं”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाने हिंदुत्व..”

वेटर स्कॅनर घेऊन गेला असता, कशाचे बिल म्हणत तिघांनी वाद घातला. तू आम्हाला बिल का मागतोस का? म्हणत चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. निर्जन ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी मारहाण करत वेटरच्या खिशातील ११ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले.

हे ही वाचा…सांगली : मिरजेत पैगंबर जयंतीची मिरवणूक लांबणीवर, गणेशोत्सव – पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने निर्णय

याप्रकरणी शेख साहिल अनुसूद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून, सखाराम जनार्दन मुंडे आणि अन्य अनोळखी दोघांविरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय