हिंगोली : शहरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण उडवली असून अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे झाडे विद्युत वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगोली शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, पालिकेचे अग्निशमनदल कार्यालय, जुनी पोलीस वसाहत या भागांत मोठे  वृक्ष उन्मळून पडले. अग्निशमनदल कार्यालयाच्या परिसरातील झाड वाहनांवर पडल्यामुळे एक जीप व एका ऑटोचे नुकसान झाले. शहरात लहान-मोठी सुमारे १०० झाडे पडली आहेत. याशिवाय शहरातील काही भागांत घरांवरचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. काही पत्रे वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांना अडकून मोठा आवाज झाला, तर काही ठिकाणी झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्यामुळे वीज वाहिन्या तुटून पडल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In hingoli rain storm winds hundreds of trees collapsed power supply also interrupted ysh
First published on: 29-05-2023 at 00:02 IST