कराड : पाटण तालुक्यातील विहे गावात २० एकर तसेच कराड तालुक्यातील कालवडेमध्ये ३५ एकर, चिंचणीत पाच एकर ऊस जळून शेतकऱ्यांचे एक कोटी रुपयाहून अधिक नुकसान झाले. विहे (ता. पाटण) येथील आठ शेतकऱ्यांचा सुमारे २० एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग विझवताना अडथळे आले. परंतु, ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांनी धोका पत्करत कमालीचे झटून आगीवर नियंत्रण आणल्याने लगतचा जवळपास ५० एकर ऊस आगीपासून वाचला आहे. या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी विजतारांमधील गळतीमुळे (शॉर्टसर्किट) आग लागल्याचा अंदाज बांधला जात आहे.

हेही वाचा : Mahadev Jankar: ‘तुमचा एकच आमदार भाजपानं पक्षासह पळविला तर’, महादेव जानकर म्हणाले, “मी शरद पवारांसारखं…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण…

कराड तालुक्यातील कालवडेमध्ये ३५ एकर ऊस जळून खाक झाला. तर, पुनर्वसित चिंचणी गावानजीक विजतारांमधील गळतीमुळे (शॉर्टसर्किट) पाच एकर ऊस जळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आगीच्या तिन्ही घटनांमध्ये विजतारांमधील गळतीमुळे ऊस जळून खाक झाला. वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे या घटना घडल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. हा जळीत ऊस संबंधित साखर कारखाना ओढून नेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्याचा मोबदला देतील परंतु, तो मूळ रक्कमेच्या तुलनेत तुटपुंजा राहणार आहे.

Story img Loader