वाई: राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना, आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील वातावरण गरम झालेले असताना, एकमेकांवर अक्षरशः तुटून पडणारे, पातळी सोडून एकमेकांवर टीका करणारे नेते आज पाचगणीच्या एका हाय प्रोफाईल लग्नामध्ये एकत्र आले होते. पाचगणीच्या संजीवन हायस्कूल ट्रस्टच्या भव्य मैदानावर साताऱ्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ अजित पवार गटाचे वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या लग्नाचे आयोजन करण्यात होते.

वधूवरांना शुभाशीर्वाद देण्याच्या निमित्ताने पाचगणीत राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीतील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली . निवडणुकीच्या प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर असल्याचे जाणवत असते. आमदार मकरंद पाटील यांचे बंधू मिलिंद पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव उत्कर्ष व नांदेड येथील सिंधी येथील व्हीपी के उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे यांची कन्या पूजा यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी उशिराने पाचगणीत साजरा झाला.

Action on fake Kunbi certificates All party meeting to decide on issues of OBC
खोट्या कुणबी प्रमाणपत्रांवर कारवाई; ओबीसींच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
Rohit Pawar, Ajit Pawar,
पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही, रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला
kalyan shivsena new appointment
कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका, सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी
Hindutva organization trimbakeshwar marathi news
त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रमाणपत्र, अंनिसचा आक्षेप; दुकानदारांची नाराजी
ajit pawar chhagan bhujbal unhappy
राज्यसभेच्या उमेदवारी वरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा; अजित पवार म्हणाले, “आमच्या जवळच्या काही मित्रांनी…”
Satara, Convicts, reprimanded ,
सातारा : कोयना खोरे जमीन गैरव्यवहारप्रकरणी दोषींना फटकारले
Sushma Andhare, Devendra Fadnavis,
“देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळेच…”, सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, “बाप हा बाप असतो”!
Entrepreneurs angry over consent letter for relocation in Dombivli MIDC
डोंबिवलीतील उद्योजक म्हणजे शासनाला कल्हईवाले वाटले का? डोंबिवलीतील उद्योजकांचा संतप्त सवाल

हेही वाचा : कोपर्डी आत्महत्या प्रकरण : दोन आरोपींना अटक; गावात पोलीस बंदोबस्त तैनात

या लग्नात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार श्रीनिवास पाटील महायुतीतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार प्रमुख कार्यकर्ते सनदी अधिकारी आदी उपस्थित होते. या लग्न सोहळ्यानिमित्त नेत्यांमधील अंतर गळून पडल्याचे दिसून आले.

शरद पवार समोर बसलेले असताना, त्यांच्याच पक्षाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांना भेटून वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता अजितदादांचा हा आशीर्वाद त्यांना लोकसभेच्या निवडणुकीतही मिळणार का हे पाहावं लागेल. बारातमीतल्या दोन सभा रद्द करून शरद पवार उपस्थित होते. या लग्नातील गर्दीमुळे पाचगणी वाई महाबळेश्वर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने अनेक नेते अधिकारी रस्त्यावर वाहनात अडकून पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोहोचण्यास उशीर झाला. ते रात्री साडेनऊ वाजता विवाह स्थळी पोहोचले.

हेही वाचा : “भाजपा सरकार चायनीज मॉडेलवर चालतेय”, आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका; म्हणाले, “ज्या चीनला…”

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे पाचगणीतील आ.मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या शाही लग्न सोहळ्याला महाराष्ट्रातील दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती लावली. त्यामुळे हे हायप्रोफाईल लग्न चर्चेचा विषय ठरलं. अजित पवार, उदयनराजे आणि शंभुराजे देसाई शिवेंद्रसिंहराजे शेजारी बसले होते. अजितदादांना भेटण्यासाठी अनेक लोक येत होते.

हेही वाचा : “…तर उद्धव ठाकरेंसाठी मदतीला धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”; मोदींच्या विधानावर नाना पटोले म्हणाले, “या जगात…”

अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्या या भेटीवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या, अनेकांच्या फोनच्या कॅमेऱ्यांनी हा क्षण कैद केला. लग्नाच्या ठिकाणीही या भेटीची जोरदार चर्चा सुरू होती.एका बाजूला समोर शरद पवार, श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर शशिकांत शिंदे बसले असताना दुसऱ्या बाजूला अजित पवार, उदयनराजे आणि शंभुराजे देसाई बसले होते. रामराजे नाईक निंबाळकर व शशिकांत शिंदे यांच्यात हास्यविनोद रंगले होते. आमदार मकरंद पाटील सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व बंधू मिलिंद पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. शरद पवार लग्न समारंभ उरकून बाहेर निघाले असताना स्वागत कमानीच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार शशिकांत शिंदे यांच्या नावाने घोषणा दिल्या. समारंभ संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस महाबळेश्वर येथे थांबले होते. या विवाह सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी शरद पवारांच्या साक्षीने अजित पवारांचं सर्व नेते एकमेका बरोबर हास्यविनोद रंगाची दिसून आले. यावेळी त्यांनी उशिरा खासदार उदयनराजे भोसले शिवेंद्रसिंहराजे भोसले शंभूराजे देसाई आमदार मकरंद पाटील महेश शिंदे अमित कदम यांच्याशी उदयनराजेंच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उदयनराजेंच्या प्रचारासाठी अंतिम टप्प्यात घ्यावयाच्या सभांची नियोजन करण्यात आले.