पंढरपूर : येथील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले. मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू आहे. फरशीचे काम करत असताना एक पोकळी दिसून आली. साधारणपणे पाच ते सहा फूट खोल एक खोली आहे. पुरातत्त्व विभागाने मंदिरात आढळलेल्या तळघराची पाहणी केली. यामध्ये विष्णूच्या दोन, तर महिषासुरमर्दिनी, तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच काही जुनी नाणीदेखील आढळली. या मूर्ती साधारणपणे सोळाव्या शतकातील असतील, असे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. मात्र, याबाबत संशोधन केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. हे तळघर पाच फूट x पाच फुटांचे असून, उंची सहा फूट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सातारा: मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या भागीदारीतील अनधिकृत पंचतारांकीत हॉटेल सील

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे सह अध्यक्ष, अभ्यासक आणि महाराज मंडळींच्या उपस्थितीत तळघरातील या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामामुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे लांबून दर्शन सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात असून, रविवारी (दि. २) विठ्ठलाचे पदस्पर्श म्हणजेच देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन सुरू होणार आहे. हे संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिरातील हनुमान दरवाजा म्हणजे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेऊन बाहेर पडताना डाव्या हाताला फरशी बदलण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणचा दगड काढला असताना खोल अंधार दिसून आला. संबंधित कामगारांनी मंदिर समितीला ही माहिती दिली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांनी तत्काळ पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. प्राथमिक पाहणीत पाच ते सहा फूट खोल एक खोली आढळली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pandharpur six idols found including 2 vishnu idols in the basement of shree vitthal temple css
First published on: 31-05-2024 at 21:57 IST