scorecardresearch

Premium

पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

वारकरी संप्रदायात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीला येतात.

pandharpur vithoba temple donation, 4 crore 77 lakhs donated by the devotees, kartiki ekadashi yatra pandharpur
पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ (संग्रहित छायाचित्र)

पंढरपूर : पंढरीच्या विठुरायाच्या चरणी दान देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. इथे दर्शनाला येणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या तिजोरीत ४ कोटी ७७ लाख इतके दान विविध माध्यमांतून जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समितीला मिळणाऱ्या दानात १ कोटी ५६ लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

वारकरी संप्रदायात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीला येतात. यंदा या यात्रेसाठी जवळपास ४ लाखांहून अधिक भाविक यात्रेला आले होते. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विविध माध्यमांतून ४ कोटी ७७ लाख रुपये इतकी देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये श्रींच्या चरणावर ४०,१५,६६७ रुपये तर देणगी स्वरूपात १,३०,०५,४८६ रुपये प्राप्त झाले आहेत. मंदिर समितीच्या वतीने देण्यात येत असलेल्या लाडूप्रसादातून ६२,४९,००० रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच ६६,६२,३७७ रुपये भक्तनिवासाच्या माध्यमातून तर सोने-चांदी भेट वस्तूमधून ८,३६,२५४ रुपये परिवार देवता व हुंडीपेटीतून १,५७,२१,५२७ रुपये तिजोरीत जमा झाले आहे. त्याच बरोबरीने मोबाईल लॉकर व इतर जमेमधून १०,९४,८०७ रुपये समितीला प्राप्त झालेत. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा १,५६,४८,५२६ रुपये इतकी उत्पन्नात वाढ झाली आहे.

financial subsidy for inter caste marriage couple
आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा
five lakh devotees visited the Ram temple
जय श्रीराम! पहिल्या दिवशी पाच लाख भाविक प्रभू रामाच्या चरणी लीन, अयोध्येत रामभक्तांचा मेळा
Devotees gather in large numbers at Shri Ram temple
VIDEO : प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत मोठी गर्दी, मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा
Anand Mahindra Shares Video of Ram Mandir construction Workers Share How They Felt Energy In Ayodhya Used To Work For 28 Hours
राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कामगारांचं बोलणं ऐकून महिंद्रा भारावले; म्हणतात, “२८ तास कामानंतर त्यांना बाजूला..”

हेही वाचा : “…म्हणून मंत्रीपदाच्या यादीतून अनिल देशमुखांचं नाव वगळलं”, अजित पवारांचा मोठा दावा

कार्तिकी यात्रेत सुमारे ३ लाख ४० हजार ४७८ एवढ्या भाविकांनी श्रींचे पदस्पर्श दर्शन घेतले. तर ५ लाख ७१ हजार २२० एवढ्या भाविकांनी श्रींचे मुखदर्शन घेतले असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. पंढरीच्या सावल्या विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शन घेतल्यावर भाविकांनी सढळ हाताने दान याही यात्रा कालावधीत दिल्याचे दिसून आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pandharpur vithoba temple rupees 4 crore 77 lakhs donated by the devotees on kartiki ekadashi css

First published on: 01-12-2023 at 17:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×