scorecardresearch

…अन् ती चक्क ड्रायव्हरच्या सीटवर बसली, खाली उतरायला सांगताच घातला वाद; Video पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

एखादा प्रवासी ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि तिथून उठणारच नाही म्हटला तर?

Viral Video of Bus
सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात ज्याची आपण कल्पनादेखील करु शकत नाही. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हिडीओ व्हायरल होतात ज्याची आपण कल्पनादेखील करु शकत नाही. मग त्यामधी काही मजेदार तर काही अंगावर शहारा आणणाऱ्या व्हिडिओचा समावेश असतो. सध्या राजस्थानमधील अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. शिवाय काही नेटकऱ्यांनी तर, व्हिडीओ पाहिल्यानंतर हसून हसून आमचं पोट दुखायला लागलं आहे, असं म्हटलं आहे. तर या व्हिडीओमध्ये असं काय आहे ज्यामुळे लोक पोट धरुन हसत आहेत ते जाणून घेऊया.

खरं तर आपण सर्वांनी रस्त्यावर धावणाऱ्या बस पाहिल्या आहेत आणि दररोज हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाण्याचं काम त्या करत असतात. बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सीट असतात, ज्यावर बसून ते प्रवास करतात. तसंच बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरसाठी विशेष अशा सीट्स असतात. पण जर बसमध्ये जागा मिळाली नाही म्हणून, एखादा प्रवासी ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि तिथून उठणारच नाही म्हटला तर? बस पुढे जाणारच नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. परंतू या व्हिडीओतील महिलेला आणि तिच्या सासूला कदाचित ते माहिती नसावं. हो कारण बसमध्ये जागा भेटली नाही म्हणून एक महिला चक्क ड्रायव्हरच्या सीटवर बसली आहे.

हेही पाहा- मामा असावा तर असा…! भाचीला लग्नात दिल्या ३ कोटींच्या भेटवस्तू, व्हायरल Video पाहून थक्क व्हाल

हेही पाहा- कारच्या छतावर, खिडकीतं उभं राहून बर्थडे पार्टी! YouTuber दीक्षितचा Video पोलिसांकडे पोहोचला, अन्…

हा विनोद नसून राजस्थानमध्ये घडलेली खरी घटना आहे. याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. @mishradeoki नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक महिला बसमध्ये सीट न मिळाल्याने ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्याच दिसत आहे. जेव्हा ड्रायव्हर बसजवळ येतो त्यावेळी महिला त्याच्या सीटवर बसल्याचं तो पाहतो आणि तिला खाली उतरण्यास सांगतो.

मात्र, ती महिला ती जागा सोडायला तयार होत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच बसमध्ये बसलेल्या महिलेची सासुही ड्रायव्हरशी भांडताना दिसत आहे. शिवाय महिलेच्या सासुने ड्रायव्हरला म्हणते की, जर तो चांगला ड्रायव्हर असेल तर तो बसमधील इतर कोणत्याही सीटवर बसून बस चालवू शकतो. हे ऐकून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. तर अनेकजण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 17:40 IST
ताज्या बातम्या