रत्नागिरी: जिल्ह्याला सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे लांजा तालुक्यातील मुचकुंदी, राजापूर मधील काजळी नदी, चिपळूण मधील वाशिष्टी नदी आणि खेड मधील जगबुडी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने खेड, चिपळूण, राजापूर शहर आणि रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हेही वाचा : “आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून…”; संजय राऊतांची ‘धर्मवीर २’वर सडकून टीका खेड बाजार पेठेत पाणी भरल्याने व्यापा-यांची धावपळ झाली. राजापुरमधील जव्हाहर चौकात पाणी भरले आहे. तर रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.