सांगली : मैत्रिणीसोबत कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेलेल्या तरुणाचे पार्थिव ४८ तासानंतर शिरटी (ता.शिरोळ) येथे मंगळवारी बचाव पथकाला मिळाले. सांगलीवाडीकडील तीरानजीक असलेल्या बंधा-यावर मैत्रिणी समवेत सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. हनुमाननगर) हा तरूण पात्रात पडून वाहून गेला. रविवारी सकाळी हा प्रकार घडला होता.

हेही वाचा : सांगली: पावसाचा जोर मंदावला, चांदोली धरण निम्म्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैत्रिणीने हा प्रकार नातेवाईकांना कळवल्यानंतर आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू टीमच्यावतीने हरिपूरपर्यंत शोध घेण्यात येत होता. मंगळवारी सकाळी शिरटी येथे नदीपात्रात मृतदेह असल्याचे समजल्याने बचाव पथकाने पात्राबाहेर काढला. सदरचे पार्थिव बेपत्ता तरुणाचे असल्याचे स्पष्ट झाले.