scorecardresearch

आटपाडीत रुग्णालयात जादूटोणा, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

या प्रकाराबाबत आटपाडी मधील सामाजिक कार्यकर्ते संपतराव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे.

आटपाडीत रुग्णालयात जादूटोणा, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
आटपाडीत रुग्णालयात जादूटोणा, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद ( image – लोकसत्ता टीम )

सांगली : आटपाडी मध्ये रुग्णालयातच एका रुग्णावर तंत्रमंत्र, जादूटोण्याने उपचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या परवानगीशिवाय घुसून रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असूंन ध्वनीचित्रफित समाज माध्यमावर प्रसारित होत आहे. संबंधित व्यक्तीना डॉक्टरांनी विरोध केल्यानंतर डॉक्टरांशीही हुज्जत घालत असल्याचे चित्रीकरणमध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराबाबत आटपाडी मधील सामाजिक कार्यकर्ते संपतराव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 11:42 IST

संबंधित बातम्या