scorecardresearch

Premium

कोयनेतील पाण्याचा वाद घरगुती मामला – पालकमंत्री खाडे

मतदार संघात विकासाची कामे केली असल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी मुद्देच नसल्याचे पालकमंत्री खाडे यांनी म्हटले आहे.

dispute on koyna water news in marathi, koyna water is our domestic dispute
कोयनेतील पाण्याचा वाद घरगुती मामला – पालकमंत्री खाडे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : कोयनेतून सांगलीसाठी सोडण्यात येणार्‍या पाण्याबाबतचा वाद आमचा घरगुती मामला असल्याचे सांगत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना अधिक भाष्य करणे टाळले. याबाबत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाणी सोडण्यात सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे अडथळे आणत असल्याचा आरोप केला होता. पावसाच्या हंगामापासून कृष्णा नदी कोरडी पडण्याचा प्रकार तीन वेळा घडला. तर कोयनेतून पाण्याचा विसर्ग वेळापत्रकाप्रमाणे होत नसल्याने ताकारी योजना बंद पडली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या वाट्याला असलेले ३५ टीएमसी पाणी वेळेत मिळावे, शासकीय यंत्रणेकडून कोयनेतून विसर्ग करण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी करीत भाजपचे खासदार पाटील यांनी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत मंत्री देसाई यांच्या हस्तक्षेपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री खाडे यांना कोयनेतून पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने होणार, असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी हा आमचा घरगुती मामला आहे असे सांगत बोलणे टाळले.

Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
yavatmal farmer leader marathi news, sikandar shah pm narendra modi
“पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तोंड कसे दाखविणार? उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी निम्म्यावर आणले”, शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टीका
chitra wagh reply to ubt leader sushma andhare
“विरोधकांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” चित्रा वाघ यांनी सुनावले; म्हणाल्या, “त्यांना केवळ देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा…”
mumbai drug license marathi news, mumbai drug shops marathi news
औषध परवान्यांच्या निलंबनाऐवजी दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव, निलंबन रद्द करण्याचे अधिकार फक्त मंत्र्यांना!

हेही वाचा : “ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव”; छगन भुजबळांच्या आव्हानावर जरांगे म्हणाले, “जेलमध्ये…”

मिरज विधानसभा मतदार संघात गत निवडणुकीत आपले मतदान ९३ हजारांवरून ९६ हजार झाले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी विरोधकांकडून केवळ एकच उमेदवार समोर होता, यामुळे मताधिक्य घटले असले तरी भाजपचे मतदान वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघात विकासाची कामे केली असल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी मुद्देच नसल्याचे पालकमंत्री खाडे यांनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In sangli guardian minister suresh khade dispute on koyna water is our domestic dispute css

First published on: 09-12-2023 at 19:51 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×