scorecardresearch

Premium

“जीव गमवावा लागणे हे दुर्दैवी, आमच्या काळात…”, औषधे खरेदीवर जयंत पाटील म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदींसाठी घरोघरी फिरावे लागत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

ncp leader jayant patil criticize shinde fadnavis government, ncp leader jayant patil on medicine purchase
साखराळे येथे ’एक तास राष्ट्रवादीसाठी’ उपक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. समवेत विजयराव पाटील, आनंदराव पाटील, अविनाश पाटील, सुजाता डांगे, अलका माने व मान्यवर. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदींसाठी घरोघरी फिरावे लागत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. इस्लामपूरमध्ये दोन दिवसांपुर्वी बावनकुळे यांनी जनसंवाद साधला होता, याचा संदर्भ घेत जयंत पाटील यांनी टीका केली. साखराळे येथे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी’ या उपक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, सरपंच सुजाता डांगे, राष्ट्रवादी सेवादलाचे साखराळे अध्यक्ष अविनाश पाटील, उपसरपंच बाबुराव पाटील आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘मातोश्री’ची दारे तुमच्यासाठी उघडी असतील का? भरत गोगावले म्हणाले…

Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल
Devendra Fadnavis on Ashok Chavan joining BJP
“आगे आगे देखिए होता है क्या…”, अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य
jagan mohan and narendra modi meet
एकीकडे टीडीपीशी युतीवर चर्चा, दुसरीकडे YSRCPचे जगनमोहन-मोदी यांची भेट; आंध्र प्रदेशसाठी भाजपाची रणनीती काय?

जयंत पाटील म्हणाले, ‘नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागणे, हे दुर्दैवी आहे. आमच्या काळात आम्ही औषधे खरेदीचे अधिकार संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. या सरकारने ते अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता आम्ही बोलू लागल्यावर सरकारने अधिकार्‍यांना औषध खरेदीचे अधिकार दिल्याचा नवा आदेश काढला आहे.’ दरम्यान प्रारंभी अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In sangli ncp leader jayant patil criticize shinde fadnavis government on the issue of medicine purchase css

First published on: 08-10-2023 at 18:31 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×