scorecardresearch

Premium

सातारा : कोयना जलाशयातील तराफा सेवा तांत्रिक अडचणीमुळे बंद

तराफा सेवा अचानक बंद झाल्याने अनेक स्थानिक वाहनचालक व पर्यटकांची गैरसोय झाली आहे.

koyna reservoir, technical problem, rafting service stopped in koyna reservoir
सातारा : कोयना जलाशयातील तराफा सेवा तांत्रिक अडचणीमुळे बंद (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वाई : साताऱ्याच्या कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागात सुरु असणारी तराफा सेवा अचानक बंद झाल्याने अनेक स्थानिक वाहनचालक व पर्यटकांची गैरसोय झाली आहे. दुर्गम कोयना खोऱ्यात कोयना नदीच्या शिवसागर जलाशयातून वाहनांची पाण्यातून वाहतूक करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तराफा सेवा सुरू आहे. बामणोली, तापोळा भागातील दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेला तराफा (बार्ज) रविवारी गाढवली बाजूला वाहने सोडून परत तापोळ्याकडे येत असताना पाण्याखालील पंख्याचा शाप्ट तुटून बंद पडला.

हेही वाचा : Article 370 Verdict : सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण, म्हणाले…

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
Sizing industry in Ichalkaranji closed indefinitely
इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बेमुदत बंद, अर्थकारण ढेपाळले; कोट्यवधीची उलाढाल ठप्प
Investment growth potential due to aviation services in Gondia
उद्योग, आरोग्यसेवेत सुधारणा, कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज; गोंदियामध्ये विमानसेवेमुळे गुंतवणूक वाढीची शक्यता

हा तराफा केळघर, तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या मोठ्या वाहनांची पाण्यातून वाहतूक करत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव असलेल्या दरे व कांदाटी खोऱ्यात वाहने नेण्यासाठी या तराफ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. अचानक झालेल्या या बिघाडामुळे स्थानिक पर्यटकांसह अनेकांना याचा फटका बसला. तराफ्याचे पाण्यात पडलेले शाप्ट व काही भाग काढले असून दुसरा पंखा शिल्लक असून सोमवारी आवश्यक असणाऱ्या भागांची जुळणी करून मंगळवारी सायंकाळपर्यंत तराफा सेवा पुर्ववत करण्याचा प्रयत्न राहील, असे चालक संतोष पवार यांनी सांगितले. हा भाग दुर्गम असून पर्यटक आपली वाहने ताराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा-ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात. तराफा बंद झाल्याने परिसरातील दळनवळण बंद झाले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In satara at wai rafting service in koyna reservoir stopped due to technical problem css

First published on: 11-12-2023 at 16:43 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×