सातारा :मुलीच्या बालविवाहास विरोध करणाऱ्या वडिलांना नातेवाइकांनीच मारहाण करण्याची घटना माण तालुक्यात घडली. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

महादेव राजाराम काळेल (वळई, ता माण) यांची मुलगी अल्पवयीन असतानाही त्यांच्या पत्नीच्या नातेवाइकांकडून तिच्या विवाहाचा घाट घातला जात आहे. याला महादेव काळेल यांचा विरोध होता. यातूनच ते दुचाकीवरून बाहेर जात असताना त्यांच्या पत्नीचे नातेवाईक राजेंद्र येडवे, संजय येडवे, चैतन्य येडवे, शरद येडवे, दादासो विजय हिप्परकर, महेश धनाजी गळवे, श्रीकांत शिवाजी हिप्परकर व अनिता धनाजी गळवे (ता. सांगोला, जि. सोलापुर) यांनी त्यांना अडवून मारहाण केली.

तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद महादेव काळेल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली. म्हसवड सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे अधिक तपास करत आहेत.