सावंतवाडी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे. मात्र, ज्या प्लिकेशनवर अर्ज सादर करायचे, तेच अॅप ‘सर्व्हर डाऊन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. परिणामी, लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे. मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना जागरण करावे लागत आहे, तसेच ‘ओटीपी’साठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागत आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ‘नारीशक्ती’ अॅप उपलब्ध करून दिले. गत चार ते पाच दिवसांपासून मात्र ‘नारीशक्ती’ हे अॅप सुरूच होत नसल्याचे दिसून येत आहे. अॅपवर ‘क्लिक’ करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिलांची झोप उडाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येत आहेत. त्यासाठी सर्व कागदपत्रे सेविकांकडे जमा करायची असून, सध्या हजारो महिलांनी आपली कागदपत्रे सेविकांकडे सुपूर्द केली आहेत. मात्र, अॅप सुरूच होत नसल्याने सेविकांचीही पंचाईत झाली आहे.

Shukra Nakshatra Gochar 2024
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
ngo umed education charitable trust
सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
CCTVs in uran area have off for several months
उरणकरांची सुरक्षितता रामभरोसे?
Shani and Surya created a samsaptak yoga
नुसता पैसा; तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि सूर्याने निर्माण केला ‘दुर्लभ योग’, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् प्रसिद्धी
What is the price of gold on Shri Krishna Janmashtami
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सोन्याचे दर बघून ग्राहक चिंतेत.. झाले असे की…

हेही वाचा : Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरे दिल्लीत देवदर्शनासाठी गेलेत”, शिवसेना शिंदे गटाची बोचरी टीका

नारीशक्ती दूत हे अॅप दिवसभरात सुरू होत नाही. काही वेळा रात्री अकरानंतर हे ‘अॅप’ चालते. त्यामुळे अंगणवाडी सेविका रात्री जागरण करून जेवढे अर्ज भरता येतील तेवढे अर्ज भरून घेत आहेत. मात्र, त्यासाठी अर्जदार महिलेला रात्री फोन करून तिच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ‘ओटीपी’ सेविकांना मागावा लागत आहे.

हेही वाचा : Laxman Hake : “राज ठाकरे तुम्ही खरोखरच प्रबोधनकारांच्या घराण्यात…”, लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

नारीशक्ती दूत अॅप्लिकेशन सध्या तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनाही ऑनलाईन अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय. दिवसभर अॅप चालत नाही. रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे. रात्री एक ते दोन वाजेपर्यंत हा फाॅर्म भरण्यासाठी खटपट करावी लागते. तसेच ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क बाबतीत अडथळे पार करून हे करावे लागत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेत एक लाख ३६ हजार ५२७ लाभार्थी पात्र ठरले आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.