सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक विरोधात महसूल यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान कुडाळ येथे शुक्रवारी रात्री नायब तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली असून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे असे सर्व अधिकारी उतरले आहेत. यापुढेही कारवाई अधिक कडक होण्याची शक्यता आहे.कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले होते. या मध्ये नायब तहसीलदार प्रतीक आढाव, वालावल मंडळ अधिकारी धनंजय सिंगनाथ, चेंदवन तलाठी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगाव तलाठी ओंकार केसरकर, घाटकरनगर तलाठी निलेश कांबळे, माणकादेवी तलाठी स्नेहल सागरे, सोनवडे तर्फ कळसुली तलाठी शिवदास राठोड, पणदुर तलाठी रणजीत कदम, शिवापूर तलाठी सुरज भांदिगरे यांची नेमणूक करण्यात आली होती. हे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
Clean up marshal recovery of penalty outside Dadar railway station Mumbai Municipal Corporation action video viral
दादर रेल्वेस्थानकाबाहेर ‘या’ लोकांकडून केली जातेय दंड वसुली; मुंबई पालिकेच्या कारवाईची ही कोणती पद्धत? VIDEO VIRAL
High Court gives unique punishment to drunk driver
सिग्नलवर ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन उभा राहा; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्याला उच्च न्यायालयाची आगळी शिक्षा
saplings , Katai road , Dombivli,
डोंबिवलीत काटई रस्त्यावर झाडांची रोपे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा
Major action against sand smugglers Revenue Department destroys 15 boats
बुलढाणा : वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई, महसूल विभागाने १५ बोटी केल्या उद्ध्वस्त
Transport e-challans worth Rs 2500 crore pending across the state
दंडात्मक कारवाईला ‘खो’; राज्यभरात अडीच हजार कोटींवर वाहतूक ई-चालान प्रलंबित

हेही वाचा…Guardian Minister Post : मोठी बातमी! पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? बीडचं पालकमंत्री कोण? वाचा यादी

या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करणे करता या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.

हेही वाचा…Sunil Tatkare : “…तोच खरा राजीनामा असतो”, सुनील तटकरेंची आमदार उत्तम जानकरांच्या राजीनाम्याच्या विधानावरून खोचक टीका

उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले. त्यावेळी तलाठी ओंकार केसरकर हे घाबरलेल्या स्थितीत होते.

पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.

Story img Loader