सोलापूर : सोलापूर शहरात नळावाटे अशुध्द, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर एका तक्रारदाराच्या तक्रारीशी संबंधित पालिका प्रशासनाने घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यावर आलेला अहवाल सारे काही आलबेल असल्याचा स्वरूपाचा आहे. त्यामुळे अशुध्द, गढूळ आणि काळ्याच्या पाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. पाणी नमुने तपासणीच्या पारदर्शकतेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

शहरात अनेक ठिकाणी महापालिकेमार्फत नळावाटे पुरवठा होणा-या पाण्याच्या शुध्दतेविषयी तक्रारी वाढत आहेत. भवानी पेठेसह मराठा वस्ती, कस्तुरबा भाजी मंडई परिसरात अशुध्द, गढूळ, दुर्गधीयुक्त काळे पाणी नळातून मिळत असल्याचा अनुभव आल्यानंतर भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी त्रस्त नागरिकांसह महापालिकेत येऊन उपायुक्त संदीप कारंजे यांना अशुध्द व गढूळ पाणी असलेल्या दोन बाटल्या भेट दिल्याची घटना ताजी असतानाच भवानी पेठेतील घोंगडे वस्ती परिसरात गढूळ, दुर्गधीयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत सुनील कोडगी या जागरूक नागरिकाने केलेल्या तक्रारीवर पालिका प्रशासनाने संबंधित भागातील दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासले. यात संबंधित नमुन्यातील पाण्यामध्ये एमपीएन काऊंट आणि क्लोरीनचे प्रमाण समाधानकारक असल्याने हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

Nashik city, Nashik city to Experience Complete Water Shutdown, water shutdown in nashik, nashik news,
नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद
Vasai industries marathi news
वसईतील उद्योग गुजरातला स्थलांतरणाच्या मार्गावर, सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार; उत्पादनावर परिणाम
8 Zika patients found in maharashtra in two months
राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
Nashik Dam Protest, Nashik, Administration Increases Water Discharge from Kashyapi Dam, nashik news,
काश्यपीतील विसर्गात पुन्हा वाढ, दुष्काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाची मध्यस्थी; ग्रामस्थांची नरमाई
Excavation of Wadala to Paral water tunnel completed by Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिकेतर्फे जलबोगद्यांचा विक्रम… न्यूयॉर्कपाठोपाठ सर्वांत मोठे जाळे… पण यातून पाणी प्रश्न सुटणार का?
Kalwa, Mumbra, Diva, Water Supply in Thane to Halt for 24 Hours, Water Supply to Kalwa Mumbra and Diva Areas in Thane to Halt for 24 Hours, water supply, water supply in thane, Channel Repair Work, thane news,
कळवा, मुंब्रा, दिवा भागात शुक्रवारी पाणी नाही; ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार
separate road will be built for the construction of the vadhavan port
‘वाढवण’साठी स्वतंत्र पायाभूत सुविधा; पालघर जिल्ह्याचा आर्थिक स्तर तिपटीने वाढण्याचा दावा
Mumbai , water supply,
मुंबईतील पाणीपुरवठ्याचे पर्यायी प्रकल्प कागदावरच

हेही वाचा : सातारा: मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या भागीदारीतील अनधिकृत पंचतारांकीत हॉटेल सील

या अहवालाबाबत तक्रारदार सुनील कोडगी यांनी आश्चर्य व्यक्त करीत, महापालिकेने नमुन्यादाखल घेतलेल्या दूषित पाण्यामध्ये अळ्या सुध्दा होत्या. तरीही महापालिका प्रशासनाने पाणी दूषित नसल्याचा आणि पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा दिल्यामुळे हेच पाणी नागरिकांनी मुकाट्याने प्यावे काय,असा सवाल उपस्थित केला आहे.