सोलापूर : खोट्या माहितीच्या आधारे धमकावत एका डॉक्टर महिलेकडून ६७ लाख २४ हजार रुपये उकळणाऱ्या मुंबईच्या दोघा सायबर गुन्हेगारांना सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या पथकाने सापळा रचून अटक केली. सोलापुरात राहणाऱ्या पीडित महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील आपल्या भावाच्या घरी वास्तव्यास असताना मोबाईलवरून, मी मुंबई गुन्हे शाखेतून बोलतो, तुम्ही सिमकार्डद्वारे अश्लील चित्रफिती आणि माहिती पाठविल्याप्रकरणी मुंबईत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, हे प्रकरण विश्वास नांगरे-पाटील हाताळत आहेत. तुझे कॅनरा बँकेत खाते आहे. आधारकार्ड कोठे वापरले ? आधारकार्ड लोकांना का दिले ? त्याचे नियम तुम्हाला माहित नाहीत काय, असे म्हणून कॅनरा बँकेतील खात्याचा तपशील विचारून घेतला. नंतर पीडित डॉक्टर महिलेशी वारंवार संपर्क साधून अटकेची भीती दाखविली. या माध्यमातून पुन्हा पुन्हा धमकावत त्यांच्या वेगवेगळ्या चार बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ६७ लाख २४ हजार रुपये उकळण्यात आले.
सोलापूर: डॉक्टर महिलेला धमकावत ६७ लाखांचा गंडा, दोघांना अटक
हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच पीडित डॉक्टर महिलेने शहर पोलीस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Written by लोकसत्ता टीम
सोलापूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-10-2024 at 14:21 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSफसवणूकीचं प्रकरणCheating Caseमराठी बातम्याMarathi NewsमहिलाWomanसायबर क्राइमCyber CrimeसोलापूरSolapur
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur female doctor lost 67 lakhs in cyber fraud cyber criminal threatened her with fake information css