सोलापूर : किरकोळ कारणांवरून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका बुलेटस्वार तरूण शेतकऱ्यावर बंदुकीने गोळ्या झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे एसटी बसस्थानकासमोर भर रस्त्यावर मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे इतर साथीदार फरारी आहेत.

कुंडलिक पांडुरंग शिंदे (वय २७, रा. दसूर, ता. माळशिरस) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. या गुन्ह्यात अवधूत नारायण शेंडगे (वय २४, रा. पिसेवाडी, ता. माळशिरस) यास अटक झाली असून त्याचे साथीदार अनिल शेंडगे व सागर शेंडगे यांच्यासह अन्य दोघा अनोळखी हल्लेखोरांचा वेळापूर पोलीस शोध घेत आहेत.

Case against Geeta Khare secretary of Vighnaharta Trust in Dombivli
डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव गीता खरे यांच्यावर गुन्हा; गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका
young man killed his brother with help of his mother tried to perform mutual funeral
नागपूर : युवकाने आईच्या मदतीने केला भावाचा खून, परस्पर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न
Seven persons were arrested for attacking Angadia with a knife and trying to rob it Mumbai
भररस्त्यात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; अंगडियावर कोत्याने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न, सातजणांना अटक
kenya protests over tax raise bill
केनियात करवाढीविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर; आक्रमक जमावाकडून संसदेला आग लावण्याचा प्रयत्न
Anti-Hooligan Squad breaks the terror of hooligans Firing gang arrested
गुंडा विरोधी पथकाने गुंडांची दहशत मोडली; गोळीबार करणारी टोळी जेरबंद,७ पिस्तुल जप्त, धिंडही काढली
Anniss bhondugiri shunyavar campaign in collaboration with Panchvati Police
पंचवटी पोलिसांच्या सहकार्याने अंनिसची ‘भोंदूगिरी शून्यावर’ मोहीम
Navi Mumbai, Rabale Police Station, Registers Case Against Three, Attempted Murder, Dispute Over Police Complaint, crime news, navi Mumbai news,
नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून हत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Two people injured in mob attack in Bhadrakali
नाशिक : भद्रकालीत जमावाच्या हल्ल्यात दोन जण जखमी

हेही वाचा…पतीनेच हडप केली पत्नीच्या विमा पॉलिसीची रक्कम

कुंडलिक शिंदे हे शेतातील दैनंदिन कामे उरकून सायंकाळी गावाकडे बुलेट दुचाकीने निघाले होते. वेळापूर येथे एसटी बसस्थानकासमोर पाठलाग करीत आलेली पांढऱ्या रंगाची मोटार शिंदे यांच्या बुलेटच्या पुढे अचानकपणे आडवी येऊन थांबली. त्याच क्षणी मोटारीतून अवधूत शेंडगे व अन्य साथीदारांनी बंदुकीने कुंडलिक शिंदे यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या डाव्या कंबरेच्या खाली लागली. तेव्हा जीवाच्या आकांताने शिंदे हे गंभीर जखमी अवस्थेत बुलेट चालवत वेळापूर पोलीस ठाण्यात पळून आले. पोलिसांना त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

हेही वाचा…“संजय राऊत ज्या शाळेत शिकले, ती शाळा…”; नाना पटोलेंचा

यासंर्भात जखमी कुंडलिक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याशी मागील वर्षात अवधूत शेंडगे याच्याशी किरकोळ कारणावरून दोनवेळा भांडण झाले होते. यात एकमेकांविरूध्द पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून मुख्य आरोपी अवधूत शेंडगे हा दसूर गावात येऊन कुंडलिक शिंदे यास धमकावत होता. यातूनच त्याने आपल्या साथीदारांवर वेळापुरात शिंदे यांना गाठून त्यांच्यावर गोळीबार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी वेळापुरात गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन निरीक्षण केले. फरारी आरोपींचा शोध घेण्यासह गुन्ह्यात वापरलेली बंदूक आणि मोटार जप्त करण्याच्या सूचना त्यांनी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.