सोलापूर : नामसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या भावाची बनावट सही करून मिळकतीचे कुलमुखत्यारपत्र दुसऱ्याला देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकासह दोघाजणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात रफिक गफूर शेख (वय ५८, रा. देशमुख प्लॉट, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा फसवणुकीचा प्रकार ३० जून १९९७ ते ३ मे २०२३ या कालावधीत सोलापुरात दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. याप्रकरणी नरसय्या रामदास इप्पाकायल आणि नरसिमलू यल्लप्पा कोंडा अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा ; माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन

Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे…
Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra News LIVE Updates : “… ट्रम्प यांनी भारताचा अवमान केला”, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
Anjali damania sudarshan ghule 1
“सुदर्शन घुलेवर ८ गुन्हे, ४९ कलमं”, अंजली दमानियांनी यादीच दिली; म्हणाल्या, “कलमं लिहून थकू, पण गुन्हेगार थकत नाहीत”
Vijay Wadettiwar on Guardian Ministers Appointment Postponement
“जिल्ह्याचं पालकत्व हवं की मलिदा?” पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांचा प्रश्न; म्हणाले, “एका रात्रीत…”
Pankaja Munde News
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य, “मी बीडची कन्या आहे, पालकमंत्रिपद दिलं असतं तर…”
Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!
Rohit Pawar
“अर्थसंकल्पासाठी महायुती सरकारकडून ८३ लाखांच्या बॅगांची खरेदी”, रोहित पवारांची नाराजी; म्हणाले, “डिजिटल युगात..”
Raigad and Nashik
Guardian Minister : रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!

प्रियदर्शनी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक असलेल्या नरसय्या इप्पाकायल व त्यांचे थोरले बंधू नरसय्या रामदास इप्पाकायल यांच्यात नामसाधर्म्य आहे. त्याचा गैरफायदा घेऊन धाकट्या नरसय्या इप्पाकायल याने थोरल्या नरसय्या इप्पाकायल यांची बनावट सही करून नरसिमलू कोंडा यांना कुलमुखत्यारपत्र लिहून दिले. या खोट्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे प्रियदर्शनी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक तोतया व्यक्तीने दुसऱ्या आरोपीच्या मदतीने दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीची दस्त नोंदणी केली. यात शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Story img Loader