सोलापूर : गावातील लक्ष्मीदेवीच्या उत्सवात वाद्यांच्या तालावर पत्नीला खांंद्यावर उचलून घेत नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दिराच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी गावात घडली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. धनराज हिरा काळे (वय ३०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची भावजय आशा ऐजिनाथ काळे (वय ३३) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत धनराजची पत्नी संगीता (वय २७) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : सातारा: धोम, कण्हेर, उरमोडी, वीर धरणांतून विसर्ग बंद; नद्यांचा पूर ओसरला

class 10 student ran away to boyfriends house
सातारा: तृतीयपंथीयाच्या खुनाचा तपास सहा तासांत उघड
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Tiger in Anandvan area in Varora city Chandrapur
आनंदवन परिसरात वाघिणीचा बछड्यासह वावर
Two brothers drowned, Nandurbar taluka,
नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू
man killed in tiger attack, Bhandara District,
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना
human dead body Nehroli, Nehroli ,
पालघर : नेहरोली गावातील एका बंद घरात आढळले तीन मानवी सापळे, हत्या झाल्याचा संशय
Farmer killed in Buldhana in leopard attack
बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Abuse of girl, Satara Abuse girl, Satara Crime,
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक

नागोबाची वाडी गावात काळे कुटुंबीय राहण्यास आहे. गावात दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीदेवीचा उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाद्यांच्या तालात उत्सवाने रंग भरला असताना काही तरुण उत्साहाच्या भरात बेधुंद होऊन नाचत होते. या जल्लोषात धनराज काळे याने आपली पत्नी संगीता हिला खांद्यावर उचलून घेतले आणि तो नाचू लागला. हा प्रकार त्याची भावजय आशा काळे हिला आवडला नाही. तिने देवकार्यातून काढता पाय घेत घर गाठले. काही वेळानंतर धनराजही घरी पोहोचला. या वेळी भावजय आशाने धनराजशी भांडण काढले आणि रागाच्या भरात तिने हातातील चाकूने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत तो बाहेर पळत आला. त्याने भावजय आशा हिने पोटात चाकूने भोसकल्याचे सांगितले. त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.