अलिबाग : मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय राज्यसरकारची सुटका नाही. ज्या राज्यात मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. असा विश्वास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोपोली येथे व्यक्त केला. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिले तर २५ डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, पण त्याआघी १ डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषणाची तयारी करा असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.

गेली सत्तर वर्ष पुरावे सापडत नव्हते आता प्रत्येक जिल्ह्यात पुरावे सापडत आहेत. ज्यात १८०५ पासून १९६७ पर्यंतच्या जुन्या नोंदीचा समावेश आहे. सरकार पुर्ण ताकदीने प्रयत्न करते आहे. पहीला अहवाल गेला आहे. दुसरा तयार होतो आहे. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना लगेच दाखले वाटप सुरू झाले आहे. त्यामुळे आरक्षण दृष्टीक्षेपात आले आहे. त्यामुळे आता मागे हटू नका, एकजूट कायम ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा… चंद्रशेखर बावनकुळेंच्या कसिनोतील फोटोवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तेथे…”

मराठ्यांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे. त्यामुळे जिवाची पर्वा न करता मी या लढ्यात उतरलो आहे. गेली ७० वर्ष आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे मोठं नुकसान झाले आहे. यापुढे होऊ देणार नाही. आरक्षणासाठी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. कच खाऊ नका, आरक्षणासाठी एकजूट ठेवा, राजकारण बाजूला ठेवा, आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, मी तुमच्या जिवावर लढतोय. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, शांततेच्या आंदोलनात ताकद मोठी आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा… “माझ्याकडे २७ फोटो अन् ५ व्हिडीओ, समोर आणले तर…”, संजय राऊतांचा भाजपाला थेट इशारा

मराठा समाजाची मी वेदना मांडतो. त्यामुळे सरकारसह सर्वांनी मला शत्रू मानले आहे. पण मी त्याला फारसे महत्व देत नाही. एकदा आरक्षण मिळू द्या मग बोलू, मराठा आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्याही मराठ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आजची विराट सभा याचेच द्योतक आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, ओबिसींशी समाज बांधवांशी वाद घालू नका. भांडू नका. राजकीय स्वार्थासाठी तणाव निर्माण होऊ देऊ नका. आरक्षणाची लढाई आपण ७० टक्के जिंकलोय, आरक्षण सोपा विषय नाही, जितकी प्रॉपर्टी महत्वाची तितकेच आरक्षण महत्वाचे त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत घ्यायचेच असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी संबोधीत करतांना त्यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता तोंडसूख घेतले.