सुशीलकुमार शिंदे
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, केंद्रातील दहा वर्षांतील भाजपचे सरकार आणि स्थानिक मुद्द्यांना आलेले कमालीचे महत्त्व यांमुळे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत झालेली पाहायला मिळाली. मात्र, या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच महाराष्ट्रात अग्रेसर ठरल्याचा निष्कर्ष ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत पुढे आला आहे. राज्यात महायुतीला ४६ टक्के, तर महाविकास आघाडीला ४५ टक्के मतदान झाले असून बहुतांश मतदारसंघांमध्ये मतदारांचा कल महायुतीला अनुकूल असल्याचा निष्कर्ष ‘द स्ट्रेलेमा’ने मांडला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून निवडणूक रणनीती व सर्वेक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अचूक मतदानोत्तर चाचणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांचा कल जाणून घेतला. राज्यातील सर्व मतदारसंघांमधील एकूण तब्बल १ लाख ८ हजार ३०० मतदारांशी मतदानानंतर ‘द स्ट्रेलेमा’ने संवाद साधला. त्यातून स्पष्ट झालेले निष्कर्ष शनिवारी ‘द स्ट्रेलेमा’ने जाहीर केले. त्यानुसार राज्यात महायुतीला ४६ टक्के मतदारांनी पसंती दिली असून ४५ टक्के मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला आहे. तर वंचित बहुजन आघाडीला ३ टक्के, अपक्ष उमेदवारांना २ टक्के आणि इतर घटकांना ४ टक्के मते मिळाली आहेत. यासोबतच ‘द स्ट्रेलेमा’ने मतदानोत्तर चाचणीच्या निकालात महायुतीला २४ ते २७ जागी, तर महाविकास आघाडीला २० ते २३ ठिकाणी यश मिळेल, तसेच एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule Dhule and Malegaon Assembly constituency same voter ID
दोन मतदारसंघात एकसारखेच तीन हजार मतदान कार्ड; मोठं षडयंत्र असल्याचा बावनकुळेंचा आरोप
Sanjay Raut on Maharashtra State Co-operative Bank Scam
Sanjay Raut : “शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळणं हाच मोठा घोटाळा”, संजय राऊतांचा टोला
hotel politics in maharashtra
पुन्हा काय झाडी, काय डोंगर? महाराष्ट्रात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ परतण्यामागे काय आहे कारण?
Shiv Sena s chandrakant Raghuvanshi, chandrakant Raghuvanshi, chandrakant raghuvanshi wanted Candidacy for Dhule City, Maharashtra assembly election 2024, Dhule,
चंद्रकांत रघुवंशी यांची धुळ्यातून लढण्याची तयारी, स्थानिक इच्छुकांमध्ये चलबिचल
“राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्क्यांची वाढ अपेक्षित”, अजित पवारांकडून महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
Maharashtra Considers Stringent Law Exam Malpractice, exam malpractice, question paper leak, UP Enacts Tough Ordinance against paper leak, question paper leak, law aginst question paper leak,
उत्तर प्रदेशात प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास, महाराष्ट्रात असा कायदा पावसाळी अधिवेशनात…
Monsoon Returns in maharashtra, Meteorological Department Issues Thunderstorm Warning for Maharashtra, Marathwada, konkan, central Maharashtra, monsoon news, marathi news,
सावधान ! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
new scheme for poor women in maharashtra
महाराष्ट्रात लाडकी बहीण; मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये

हेही वाचा >>>प्रवासी बॅगेवरुन शिराळ्यातील खूनाचे गूढ उकलले, तिघांना अटक

‘द स्ट्रेलेमा’ने पक्षनिहाय आकडेवारीही जाहीर केली असून त्यात महायुतीमध्ये भाजपचे १७, शिवसेना शिंदे गटाचे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा १ उमेदवार विजयी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘द स्ट्रेलेमा’च्या मतदानोत्तर चाचणीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे ६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ६, तर शिवसेना ठाकरे गटाचे १० उमेदवार विजयी होतील. तर राज्यात एकाच ठिकाणी अपक्ष, म्हणजे सांगली मतदारसंघात विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी होतील, असा ‘द स्ट्रेलेमा’चा निष्कर्ष आहे. त्यामुळे ‘द स्ट्रेलेमा’च्या मतदानोत्तर चाचणीनुसार राज्यात महायुतीच अग्रेसर ठरली असून भाजप सर्वाधिक जागी विजयी होणारा पक्ष ठरताना दिसत आहे.

‘‘महाराष्ट्रात यावेळी पाच टप्प्यांत झालेली लोकसभा निवडणूक ही जशी राजकीय पक्षांसाठी दमछाक घडवणारी होती, तशीच ती मतदारांचीही कसोटी पाहणारी राहिली. प्रत्येक टप्प्यागणिक राज्यातील मतदारांचा कल बदलत गेल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व आले आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीला उमेदवारकेंद्रित, भावनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. परिणामी प्रचंड चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रभावी राजकीय व्यवस्थापनाद्वारे स्थानिक पातळीवर विविध घटकांची नाराजी दूर करण्यात आणि गेल्या दहा वर्षांपासूनचा आपला मतदार टिकवून ठेवण्यात भाजपला यश आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच भाजप राज्यातील सर्वाधिक जागी यशस्वी ठरताना आणि पर्यायाने महायुती राज्यात अग्रेसर ठरताना दिसत आहे.’’

लेखक हे ‘द स्ट्रेलेमा’ चे संस्थापक संचालक आहेत.

राज्याच्या ४८ मतदारसंघांतील मतदानोत्तर चाचणी

पक्ष जागा मतांची

टक्केवारी

रालोआ २४ ते २७ ४६

मविआ २० ते २३ ४५

वंचित ० ३

अपक्ष १ ४

(अपक्ष : विशाल पाटील, सांगली)

sushil@strelema.com