वाई:प्रसुती पश्च्यात गर्भाशय फाटल्याने रानगव्याचा आकस्मित मृत्यू झाला. कासवंड  (ता महाबळेश्वर )वनक्षेत्रात हा प्रकार उघडकीस आला. कासवंडच्या पश्चिमेकडे असलेल्या तांबुटा वनक्षेत्रात  स्थानिक भटकंतीसाठी गेले असताना भलामोठा प्राणी मृत अवस्थेत दृष्टिस पडला. जवळ जाऊन बघता रानगवा असल्याची खात्री झाली. हा सर्व प्रकार हा प्रकार त्यांनी वन खात्याशी संपर्क साधून वन अधिका-यांना कळवला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन अधिकारी व वन्यजीवप्रेमी घटना स्थळी हजर झाले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ पाठक यांनी गव्याच्या मृतदेहाची तपासणी करून नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. हा रानगवा मादी लिंगाचा पै लारू असून प्रसुती पश्च्यात गर्भाशय फाटल्याने मरण पावल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास वाहन व उपलब्ध साधनांची गैरसोय असल्याने त्यास त्याच ठिकाणी दहन करण्यात आले. या सबंध घटणेने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bison found dead in mahabaleshwar kaswand forest area zws
First published on: 18-03-2023 at 20:48 IST