scorecardresearch

Premium

आळंदीत इंद्रायणी नदीमुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी देखील आळंदीमधील इंद्रायणी नदी अस्वच्छ असल्याचं चित्र आहे.

Indrayani river is dirty
नदीत दुर्गंधीयुक्त पाणी आणि फेसाळलेले पाणी पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी देखील आळंदीमधील इंद्रायणी नदी अस्वच्छ असल्याचं चित्र आहे. इंद्रायणी नदीत फेस आल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. यामुळे पालखी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

११ जून रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. लाखो वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. असं असताना इंद्रायणी नदी मात्र फेसाळलेल्या अवस्थेत आहे. लाखो वारकरी याच इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करतात त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. इंद्रायणी नदी अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि रसायनयुक्त झाली आहे. एखादा बर्फाळ प्रदेशात तर नाही ना? अशी प्रचिती नदी पाहिल्यानंतर येते. पांढरे शुभ्र बर्फासारखे गोळे नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत.

yavatmal farmers, pink bollworm on cotton, cotton crop, cotton farmers worried in yavatmal, yavatmal pink bollworm on cotton
कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट; शेतकरी चिंतेत, हिरवे स्वप्न…
khamgaon gajanan maharaj viral video
Video : खामगावात कथित ‘गजानन महाराज’ प्रगटले! तोतया की बहुरुपी?, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…
raj thackeray wife sharmila thackeray, sharmila thackeray spit free road campaign, udayanraje bhosle spit free road campaign
सांगवीतील विद्यार्थ्यांचे गणेशोत्सवानिमित्त ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’; शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांचा अभियानाला पाठिंबा
ganeshotsav 2023 thane, thane ganesh visarjan 2023, thane ganesh utsav 2023, 13955 ganesh idols immersed,
ठाणेकरांची घराजवळच गणेश मुर्ती विसर्जनास पसंती, दीड दिवसांच्या १३,९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन, कृत्रिम तलाव व विशेष टाकीला प्राधान्य

आणखी वाचा-वाई: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी

इंद्रायणी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आल्याने नदीची अवस्था झाल्याच स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. या अगोदर देखील अनेकदा इंद्रायणी नदी फेसाळल्याचं पाहायला मिळाले आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indrayani river in alandi is dirty health of varkari is in risk kjp 91 mrj

First published on: 07-06-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×