Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj ) हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध किर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे ते कायमच चर्चेत असतात. तसंच इंदुरीकर महाराजांचा ( Indurikar Maharaj ) युट्यूबवरही चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या किर्तनांमधून ते अनेकदा प्रबोधनाचं कार्य करत असतात. त्यांनी धर्मांचं भांडवल करु नका असं म्हणत त्यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

“तरुणांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही या दंगली बिंगलींमध्ये पडू नका. माझ्या इतकी किर्तनं महाराष्ट्रात अजून कुणी केली नाहीत. मी अनुभवांवरुन सांगतो आहे. मी ८० किर्तनांच्या खाली महिना काढत नाहीत. माझी वाक्यं फक्त पुस्तकांतली नाहीत, तर अनुभवांमधून आलेली आहेत. आत्तापर्यंत लोकांकडे असलेल्या पेनांमध्ये कॅमेरे आहेत. जर दंगली बिंगलीत दिसले तर दहा वर्षे शिक्षा आहे. आत्तापर्यंत गरीबांचीच लेकरं आत गेली आहेत. मोठ्यांचे कधीही आत गेले नाहीत आणि जाणार नाहीत. हे मी तुम्हाला तळतळीने सांगतो आहे.” असं इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj ) म्हणाले.

धर्माचा अभिमान नाही का विचारतील त्यांना सांगा

धर्माचा अभिमान नाही का? असं कुणी तुम्हाला विचारेल त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करु नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका. सगळे पोलीस तुम्हाला सांगतील आज एकही काम पोलीस व्हेरीफिकेशन शिवाय होत नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळे दंगलीत पडू नका.” असं इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj ) म्हणाले.

हे पण वाचा- “मी खरं बोलतो अन् त्याची फळं भोगतो”, इंदुरीकर महाराजांचा रोख नेमका कोणावर?

पोलिसांचा दाखला चुकीचा मिळाला तर गेम होणार

जर पोलिसांचा दाखला चुकीचा मिळाला तर गेम झालाच म्हणून समजा. चारित्र्याचा दाखला देण्याचं काम पोलीस करत असतात. आम्ही काहीही केलं नाही, बँक लुटली नाही, गुन्हा काही केला नाही तरीही रोज नवं लफडं आहे माझ्याभोवती. गुन्हा एकच आहे ते म्हणजे मी खरं बोलतो. तुम्ही दंगली बिंगलीत पडू नका. तुम्ही गरीब राहा, घरी घरी कुल्फी विका, अजून काही विका पण या असल्या गोष्टींमध्ये पडू नका. ४० टक्के पोरं पुढाऱ्यांच्या मागे फिरून भिकारी झाली आहेत. आज पैसा कमावणंही पाप झालं. आपण कापूस ५०० क्विंटल विकला दोन कोटी आले तर लगेच दोन कोटी कुठून आले? याची चौकशी होते. आता काय करायचं बोला? फेअर अँड लव्हली लावून जर माणसं गोरी झाली असती मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? समाज मारायचा आहे विचार करु द्यायचा नाही अशा गोष्टी चालली आहे. ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला ते नोकरी देऊ म्हणतात. युज अँड थ्रो सारखं ज्यांनी पोरांना वापरलं आहे. मी मेल्यावर तुम्हाला मी काय म्हणतो आहे त्याची आठवण येईल. पण फरक काही पडणार नाही. असाही टोला इंदुरीकर महाराजांनी लगावला आहे.