देशभरात करोना रुग्णांची काही प्रमाणात वाढलेल्या संख्येनंतर खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना यातून केल्या आहेत. मात्र प्रवाशांना ही मास्क सक्ती नाही, असे स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात एक परिपत्रकच जारी केले आणि देशभरातील रेल्वेच्या सर्व विभागांना पाठवण्यात आले. स्थानकात वावरताना तसेच प्रवासात मास्कचा वापर प्रवाशांनी करावा, असे यात नमूद केले आहे. मध्य, पश्चिम रेल्वेकडून उद्घोषणांद्वारे प्रवाशांना मास्क घालण्याचे आवाहनही केले जाणार आहे. सध्या राज्यात मास्कसक्ती नाही.

मास्क मुक्त झालेल्या महाराष्ट्रात पुन्हा मास्क लागू होईल का पाहा व्हिडीओच्या माध्यमातून…

Petrol Diesel Price Today 13 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
Petrol Diesel Price Today 10 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?  
Petrol Diesel Price Today 4 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; मुंबई-पुण्यात आज पेट्रोल किती रुपये लिटर आहे?
Petrol Diesel Price Today 1 April 2024
Petrol Diesel Price Today: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इंधनाचे सुधारित दर जाहीर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय?

(हे ही वाचा: Video: केदारनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी; नियंत्रणासाठी ITBP ची तुकडी तैनात, VIP प्रवेश बंद)

सध्या महाराष्ट्रात धीम्या गतीने करोनाचे रुग्ण वाढतायत. यावर उपाययोजना केल्या जात असताना रेल्वे प्रशासनाने प्रवासावेळी मास्क लावण्याच्या सूचना केल्या आहेत.