scorecardresearch

“आमचे फोटो लावून खोके आणि मिंधे म्हणणं किती योग्य?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

राहूल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विधीमंडळाच्या आवारात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले.

Eknath Shinde
विधीमंडळाच्या आवारात झालेल्या जोडे मारो आंदोलनावरून विधानसभेत गोंधळ झाला.

विधीमंडळाच्या आवारात काल (२३ मार्च) सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. विधीमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं आंदोलन अशोभनीय असल्याचे म्हणत काँग्रेस नेत्यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. यावर विधानसभा अध्यक्षांनी माहिती घेऊन कारवाई करू असं म्हटलं. परंतु त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “विधीमंडळाच्या आवारात जे काही घडलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु ज्या लोकांनी गेल्या आठ महिन्यांपासून आमचा (शिंदे गटातील आमदार) अपमान केला ते योग्य होतं का?” दरम्यान, आमचे फोटो लावून खोके, मिंधे म्हणणं कुठल्या आचारसंहितेत बसतं? असा सवालही त्यांनी केला.

हे ही वाचा >> “आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत”, राज ठाकरेंना संजय राऊतांचा टोला, म्हणाले, “दुसऱ्यांची डोकी…”

शिंदे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणं, मिंधे म्हणणं, चोर किंवा गद्दार म्हणणं हे कुठल्या आचारसंहितेत बसतं नाना?” असा सवाल शिंदे यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला. शिंदे म्हणाले की, “आम्ही जोडे मारण्याचं समर्थन केलं नाही, करणारही नाही. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देशद्रोहाचं काम आहे. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 12:38 IST

संबंधित बातम्या