राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना इस्लामपूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी पाटील यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वारंवार समन्स देऊनही न्यायालयात हजर न राहिल्यामुळे इस्लामपूर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. त्यानंतर जयंत पाटील यांना न्यायालयात हजर राहत वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता करावी लागली. राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदा जयंत पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा- एकनाथ शिंदे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार; शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Supreme Court Grants Conditional Bail to former professor Shoma Sen in Bhima Koregaon Case
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या…
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

काय आहे प्रकरण ?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात जयंत पाटलांनी शिरगाव रसत्यावर ठिय्या आंदोलन केले होते. जमाबवंदी आदेशाचा भंग केल्यामुळे आष्टा पोलिसांनी जयंत पाटलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पाटील यांच्यासोबत राजेंद्र भासर, राजेंद्र भासर, स्वरुपराव पाटील, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील , शरद गायकवाड, मोहन गायकवाड, यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- “आदित्य ठाकरे वाघच पण..,” शिंदे गटातील आमदार सुहास कांदेंची खोचक टीका

न्यायलयात हजेरी लावत जामीनाची पूर्तता
तसेच या प्रकरणी इस्लामपूर न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्यामुळे जयंत पाटील यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी इस्लामपूर न्यायालयात हजेरी लावत जयंत पाटील यांनी वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली.