scorecardresearch

Premium

सातारा: इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठाराला भेट

विख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. श्रीमती मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास भेट दिली.

Mikhal Yakir visit to Kas Plateau
(ख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. श्रीमती मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास सदिच्छा भेट दिली त्यांच्या सोबत त्यांच्या सहाय्यक गिली मोअर,डॉ. अजित कुलकर्णी)

वाई:विख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. श्रीमती मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास भेट दिली.यावेळी साताऱ्यातील डॉ. अजित कुलकर्णी उपस्थित होते.साताऱ्यातील वास्तव्यात श्रीमती याकीर आणि श्रीमती मोअर यांनी जगप्रसिद्ध अशा कास पठार आणि ठोसेघर धबधब्यासोबत कुमुदिनी सरोवरासही भेट दिली. येथील विविधरंगी पुष्पांचे सौन्दर्य, प्रसन्न, शुद्ध तसेच आल्हाददायक वातावरण अनुभवून त्या दोघीही अत्यंत प्रभावित झाल्या. कास पठारावरील निसर्गाच्या सान्निध्यामुळे आपणास अत्युच्च कोटीचे आणि आश्चर्यकारक असे भावनिक समाधान मिळाल्याचेत्यांनी आवर्जून सांगितले. या परिसरास केवळ अभ्यासासाठीच नव्हे तर मानसिक समाधानासाठी सुद्धा वारंवार भेट देण्याचा मोह होतो असेही त्यांनी सांगितले. या निसर्ग सहवासात डॉ. याकीर यांना वन अधिकारी. माने आणि मार्गदर्शक श्रीरंग शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी कास पठार समितीने डॉ. याकीर यांना कास पठाराचे चित्र देऊन उचित सन्मान केला.

सातारा भेटीत डॉ. श्रीमती मिखाल याकीर यांनी साताऱ्यातील डॉ. अजित कुलकर्णी यांच्या होमिओपेथिक क्लिनिकला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या सोबत त्यांच्या सहाय्यक गिली मोअर याही होत्या.डॉ. श्रीमती याकीर यांनी साताऱ्यात नुकतेच एक होमियोपैथीवरील विचारमंथन शिबीर आयोजित केले होते.यावेळी त्यांनी व्याख्यानातून अत्यंत उद्बोधक असे मार्गदर्शन उपस्थित डॉक्टरांना केले. या व्याख्यानात डॉ. याकीर यांनी पंचमहाभूते, वनस्पती विकासाचे टप्पे आणि प्रकिया तसेच या दोहोंचा होमियोपैथी चिकित्साशास्त्राशी असलेला अन्योन्य संबंध याबद्दल मौलिक विवेचन केले. याच शिबिरात डॉ. याकीर यांच्या हस्ते डॉ. अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या होमियोपैथीवरील नवीन अभ्यासपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन झाले.या सर्व उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. निखिल कुलकर्णी, डॉ. प्रसाद रायरीकर, डॉ. सुजित स्वामी तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Industrialist Anand Mahindra has shown a unique glimpse of the animals in the forest
सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी जंगलातील ‘जादुई प्राण्यांची’ दाखवली झलक ! Video एकदा पाहाच…
s.s. swaminathanProfessor M S Swaminathan, Farmer , Farmer Scientist ,revolution in agriculture
एम. एस. स्वामिनाथन.. शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ
M S Swaminathan, father of India's Green Revolution, renowned Indian agricultural scientist, Indian Agricultural Research Institute
भारतीय कृषी क्रांतिकारक
seven students selected Bharat Ratna Bhimsen Joshi Youth Scholarship Maharashtra government
पं.भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती जाहीर; कोण ठरले पात्र व कश्यामुळे वाचा..

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Israeli scientist mikhal yakir visit to kas plateau satara amy

First published on: 24-09-2023 at 19:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×