“ते खातं द्यायचं काम यांचं नव्हतं, परंतु...”; एकनाथ शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर | It was not his job to give the department Eknath Shindes reply to Ajit Pawar msr 87 | Loksatta

“ते खातं द्यायचं काम यांचं नव्हतं, परंतु…”; एकनाथ शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला होता प्रश्न; जाणून घ्या काय म्हणाले होते.

“ते खातं द्यायचं काम यांचं नव्हतं, परंतु…”; एकनाथ शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदरांची अभिनंदनपर भाषणं झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलं.

“शिंदेंमध्ये पात्रता होती तर मग तुमच्या काळात त्यांना एकच छोटसं खातं का दिलं होतं?” असा सवाल अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, “ज्या पद्धतीने मी आमदार झालो, नंतर मंत्री झालो. मला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांना मी सांगितलं दोन-तीन वेळा मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला होता. कारण, साडेसहा हजार कोटी रुपये कर्ज होतं. मला फडणवीस तेव्हा म्हणाले होते, शिंदे तुम्ही चिंता करू नका आणि मला त्यांनी समृद्धी महामार्गाचं काम दिलं. मगाशी आपण म्हणालात, की एमएसआरडीसीचं खातं दिलं. तुम्ही चांगलं खातं द्यायला पाहिजे होतं. परंतु ते खातं द्यायचं काम यांचं नव्हतं. परंतु त्यांनी खातं जे बुडीत झालं होतं. त्याला ताकद दिली आणि समृद्धी महामार्ग आज पूर्णत्वास जातोय.”

Maharashtra Floor Test Live : सध्या लोकप्रिय निर्णय घेण्याकडे सगळ्यांचा कल – अजित पवार; पहा प्रत्येक अपडेट

तसेच, “मी स्वत: तिथे फिरलो. मला फडणवीस म्हणाले हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे तुम्हाला करायचं आहे. राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे. हजारो, लाखो, करोडो लोकांना फायदा देणारा हा प्रोजेक्ट आहे. मी धोका पत्कारून जायचो, माझे तिकडे पुतळे लावलेले असायचे. माझ्या विरोधात आंदोलनं झाली. मात्र आज समृद्धी महामार्गामुळे लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे. मी फडणवीसांचं मनापासून अभिनंदन करेन, की त्यांनी मला काम करण्याची संधी दिली.” असंही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलून दाखवलं.

“एकनाथ शिंदेंमध्ये पात्रता होती, तर मग तुमच्या टर्ममध्ये त्यांना एकच छोटंस खातं का दिलं होतं?”

“सत्ता येते सत्ता जाते, मी नेहमी राज्यात फिरत असताना सांगत असतो की ताम्रपट घेऊन कोणीच जन्मला आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस मी तुमचं भाषण फार बारकाईने ऐकत होतो. मला एक गोष्ट कळत नव्हती की तुम्ही इतकं एकनाथ शिंदे यांचं समर्थन करत होतात. मग मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रीमंडळात जे होते, त्यावेळी फक्त रस्ते विकास महामंडळच खातं त्यांना का दिलं? ते एवढे कर्तृत्ववान होते.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते, आम्ही ते शस्त्र…”; ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा

संबंधित बातम्या

“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
“दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
कर्नाटकचा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न; जतच्या दुष्काळी भागात तलावात सोडले पाणी
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?
उदयनराजेंच्या नाराजीवर शिवेंद्रसिंहराजेंचे मोठे विधान, म्हणाले “ज्या घराण्याचे वारस आहात त्याच…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, “काश्मिरी पंडितांचा…”
बनावट आधार, पॅनकार्डव्दारे १८ कोटींचा वस्तू व सेवाकरचा घोटाळा उघड; गुजरातचे व्यापारी कोठडीत
FIFA WC 2022: मोरोक्कोच्या जादुई दोन गोलमुळे कॅनडा आणि बेल्जियम विश्वचषकातून बाहेर, क्रोएशिया बाद फेरीत दाखल
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला