सांगली : भारताला जगात प्रथम क्रमांक आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. त्याच दिशेने भाजप व मित्रपक्षांची वाटचाल सुरू आहे. यामुळे पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच सत्तेवर येईल असा विश्‍वास मध्य प्रदेशचे माजी मंत्री तथा भाजपचे महाराष्ट्र उप प्रभारी जयभानसिंग पवैय्या यांनी मिरजेत व्यक्त केला.मोदी अ‍ॅट ९ या उपक्रमाअंतर्गत मिरजेत बुध्दीजीवी नागरिकांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पैवय्या म्हणाले, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेंव्हापासून देशात खर्‍या अर्थाने विकासाचे पर्व सुरु झाले. गेल्या नऊ वर्षात मोदीजींनी देशात विकासाची गंगा आणली. जगात भारताला नंबर एक बनविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही व त्याच दिशेने भाजपा आणि मित्रपक्षांची वाटचाल सुरु आहे. देशातील जनतेने मोदीजींच्यावर दाखविलेला विडास लक्षात घेता २०२४ मध्ये देखील नरेंद्रजी मोदी यांच्य्याच नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल यात कोणतीही शंका नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या बहुमोल कार्यात देशातील बुद्धिजीवी वर्गाचे योगदान मोलाचे आहे.

ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची शान उंचावण्याचे काम मोदी यांनीच केले आहे. कोव्हीड च्या काळात भारताकडून झालेल्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली व भारताचे कौतुक केले. आपल्या कणखर धोरणामुळे सीमेपलीकडील शत्रुंना जशास तसे उत्तर देऊन परतवून लावले. सर्वच क्षेत्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासामुळेच पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनता विश्‍वास व्यक्त करेल यात शंका नाही.या संमेलनास शहरातील नामवंत डॉयटर्स, वकील, चार्टर्ड अकौटंटस, इंजिनीअर्स, बिल्डर्स, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील व आध्यात्मिक क्षेत्रातील तज्ञ, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज, प्रगतशील व्यावसायिक व शेतकरी, संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.