शंभुराजे देसाई यांचे मत

हिंगोली : अपघातात सापडलेल्या व्यक्तींना तत्काळ मदत मिळण्यासाठी हिंगोलीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मिळालेल्या २ हेक्टर जागेवर पोलीस मदत केंद्र उभारले जाईल. कच्च्या कैद्यांसाठी हिंगोलीत कारागृह उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिली. देसाई हे शिवसैनिकांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी देसाई यांच्यासमोर हिंगोलीतून जाणाऱ्या महामार्गावर पोलीस मदत केंद्र आणि कारागृह नसल्याने कैद्यांना इतरत्र ने-आण करण्यावर होणाऱ्या खर्चाकडे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी बोलताना देसाई म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खऱ्या अर्थाने पोलीस मदत केंद्राची गरज आहे. यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे मदत केंद्र उभारण्यासाठी प्राधान्य देणार आहे.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
uran, irresponsible, heavy vehicle parking, cause accident, jnpt palaspe national highway, marathi news,
उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल
sacked police officers
बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळीने साडेपाच कोटी रुपये लुटले, १२ जण अटकेत

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निश्चितच हिंगोलीतील कारागृहाच्या मुद्दय़ावर विशेष लक्ष घालून येथे कच्च्या कैद्यांसाठी व्यवस्था उभारण्याकरिता निधी मंजूर करून घेणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार संतोष बांगर, जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, अंकुशराव आहेर, राम कदम, सभापती फकीरा मुंडे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला देसाई पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दरम्यान, जिल्हा परिषदेवर एक हाती शिवसेनेची सत्ता आली पाहिजे, शिवसेनेचा विस्तार झाला पाहिजे, घर तिथे शिवसैनिक हवा. जिल्ह्यात एकच आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत ही संख्या वाढण्याच्या दृष्टीने आत्तापासूनच पदाधिकारी, शिवसैनिकांनी कामाला लागावे. राज्य शासनाच्या जनहिताच्या दृष्टीने असलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे, असे आवाहन केले.