scorecardresearch

अल्पवयीन मुलीस डांबून ठेवून बलात्कार, हिंगोलीतून सुटका

जालन्यातील तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन हिंगोली जिल्ह्यत डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार आहे.

अल्पवयीन मुलीस डांबून ठेवून बलात्कार, हिंगोलीतून सुटका
(संग्रहित छायाचित्र)

जालना शहरातील सुंदरनगर भागातील तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन हिंगोली जिल्ह्यत डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या संदर्भात चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी १३ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली म्हणून तक्रार नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा पोलीस शोध घेत होते. संशयितांवर पाळत ठेवल्यानंतर पीडित मुलीस सेनगाव येथे एका शेतात डांबून ठेवले असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर या मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यतील आरोपी दत्ता धनगर याच्यासह दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलीची विक्री करण्याचा आरोपींचा डाव होता किंवा कसे, या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

शुक्रवारी रात्री उशीरा जालना जिल्ह्यतील दोन महिलांना अटक केली आहे. या पूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यात बलात्काराचे कलम वाढविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी सांगितले. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या