scorecardresearch

जालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका व्यक्तीने मक्याच्या शेतीत गांजाची लागवड केली आहे.

जालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त
कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील प्रल्हादपूर शिवारातील गट क्रमांक ५१ मध्ये एका व्यक्तीने मका पिकाच्या बांधावर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

दगडूबा धोंडिबा खेकाळे असं आरोपीचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथील रहिवासी आहे. आरोपीनं आपल्या शेतात गांजाच्या झाडांची विना परवाना लागवड केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून छापेमारी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजाची १ लाख ३ हजार ७०० रूपये किमतीचे झाडे जप्त केली आहे.

हेही वाचा- पांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दगडूबा धोंडिबा खेकाळे याला ताब्यात घेतलं आहे. आरोपीविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंह बहुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटुंभरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या