scorecardresearch

जामखेड पालिका कर्मचारी संघटनेचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे; जामखेड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी – जिल्हाधिकारी

जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या विरोधात पालिका कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कर्मचारी संघटनेने गेले दोन दिवस सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.

जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारींची चौकशी करण्याच्या लेखी आश्वासनाचे पत्र तहसीलदार योगेश चंद्र यांनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांच्याकडे दिल्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले.

नगर : जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या विरोधात पालिका कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कर्मचारी संघटनेने गेले दोन दिवस सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.

जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे प्रशासनाधिकारी प्रशांत खांडकेकर यांच्या लेखी आश्वासनाचे पत्र तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. या वेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, श्री शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, अ‍ॅड. प्रवीण सानप, विशाल पवार, शिवकुमार डोंगरे, राम पवार आदी उपस्थित होते.

जामखेड पालिकेचे मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांना सातत्याने अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे, असा आरोप करत कर्मचारी संघटनेने गेले दोन दिवस लेखणी बंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर बुधवारपासून बेमुदत बंदचा इशारा दिला होता. मात्र, बेमुदत बंद सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे पालिका विभागाचे प्रशासनाधिकारी खांडकेकर यांनी संघटनेच्या तक्रारीची चौकशी करून कारवाईचे आश्वासन देणारे लेखी पत्र तहसीलदार चंद्रे यांच्यामार्फत संघटनेला दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

मुख्याधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक बंद न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा डॉ. जाधव यांनी दिला. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणीही संघटनेने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रांताधिकारी थोरबोले यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आल्याचे समजते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jamkhed municipal employees union agitation written assurance inquiry corporation chief collector ysh

ताज्या बातम्या