ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरूण साधू यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे एक लाख रूपये रोख आणि मानचिन्ह असे स्वरूप असते. येत्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज जयंतीदिनी अरूण साधू यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात येईल.