महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारवर मंगळवारी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’मध्ये (MNS Thane Uttar Sabha) तोफ डागली. मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली.  त्यात त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडल़े राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला. या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. याच टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील असा करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. या टिकेला उल्लेख करणाऱ्या राज ठाकरेंना जयंत पाटील यांनी व्हायरस असं म्हटलं आहे. ट्विटरवरुन राज ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. “२०१४ ला मोदींना पाठींबा, २०१९ ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “पुतण्या माननिय बाळासाहेब ठाकरेंचा मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी,” असंही जयंत पाटील म्हणालेत. ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये जयंत पाटलांनी, “वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> ‘रिंकिया के पापा’ गाण्याने स्वागत’, ‘क्या नेता बनेगा रे तुम लोग’ ते ‘महाराष्ट्र धर्म सोडला का?’; ठाण्यातील सभेआधीच राज ठाकरे ट्रोल

दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये आपण पंतप्रधान मोदींची भूमिका आवडली नाही की उघडपणे बोलतो असं सांगितलं होतं.  उद्या नरेंद्र मोदींनी काही चुकीच केले तर मी परत त्यांच्याविरोधात बोलेन, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावरही टीका केली.