Jayant Patil Criticize Raj Thackeray : पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशा पाहिजेत? अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२५ जुलै) केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे टोला मारला. त्यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मूळ गोष्टींकडे म्हणजे पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशा पाहिजेत? बहिणीला १५०० रुपये देणार, भावाला इतके देणार. राज्य सरकारकडे पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत. मूळ प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हेच महाराष्ट्र विधानसभेसाठी तुमचं कँपेन असलं पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> Raj Thackeray : “लाडका भाऊ आणि लाडकी बहीण दोघं एकत्र राहिले असते तर..”, राज ठाकरेंची टोलेबाजी

राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर जयंत पाटील( Jayant Patil Criticize Raj Thackeray) म्हणाले, “राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकचेय्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नव्हती. त्यांची त्या दोघांशीही ओळख होती. पण आता त्यात बोलण्यात अर्थ नाही. पुलाखालून पाणी बरंच वाहून गेलंय. दोन वेगळे पक्ष तयार झाले, दोन अस्तित्व तयार झाली.

“महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला समर्थन दिलंय. महाराष्ट्रातील लोकांना नैतिकतेचं महत्त्व आहे. नैतिकतेला महत्त्व देणारी महाराष्ट्रातील जनता आहे तोवर आम्हाला चिंतेचं कारण नाही. त्यामुळे आमचा पक्ष का फुटला, कोणत्या कारणाने फुटला. हे सर्व देशाला नाही, तर जगाला माहितेय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्या मागे उभी आहे. नाहीतर १० पैकी ८ जागा आणि ९वी जागा आल्यातच जमा आहे. एवढा परफॉर्मन्स सहसा दिसत नाही. तो आज दिसतोय”, असं जयंत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil criticize raj thackeray over ladaki bahin and bhau yojana sgk
Show comments