लवकर सत्तेत येण्याची घाई भाजपाला झाल्याने सगळ्या मार्गांचा अवलंब आणि… – जयंत पाटील

संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही, असंही म्हणाले आहेत.

(संग्रहीत छायाचित्र)

“मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही. ते निर्दोष होतीलच परंतु माणसाला मानसिक छळ करण्याचे काम आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्र सरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय.”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला.

तसेच, “कुठलंही काम हे मेरीटने होणार यामध्ये मराठी आणि अमराठी असल्याचा विषय येत नाही. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना २८ महिने ईडीने तुरुंगात ठेवले ते मराठीच होते ना… मेरीटनेच सगळे होणार आणि आघाडी सरकार कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमचं सरकार निष्पक्षपातीपणाने काम करतंय…जी कागदपत्रे पुढे येत आहेत ती धक्कादायक आहे. हे धक्कादायक असल्यानेच एनसीबीने दिल्लीहून चौकशी समितीने त्यांची चौकशी केली. त्यामुळे त्यांचे दाखले हा विषय नसला तरी त्यापेक्षा खंडणीचा जो प्रकार आहे, हा अगोदर कधी प्रकार कधी घडला नाही आताच्या राजवटीत मात्र ते सुरु आहे.” असेही जयंत पाटील म्हणाले.

“जिल्हा परिषदेत आघाडी जर झाली तर आघाडीची चर्चा करण्याअगोदरच स्वबळाची भाषा बोलणं म्हणजे थोडंसं आघाडी करायचीच नाही अशा भावनेतून बोलण्यासारखं होतं, तशी आमची भावना नाही. आघाडीला आमचं प्राधान्य आहे. स्वबळाचा नारा आज द्यायची गरज नाही. सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सामंजस्याने, चांगल्या पद्धतीने या जिल्हा परिषदेत काम करतील.” असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jayant patil criticizes bjp msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या