मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना अनेक धक्के दिले आहेत. विधानपरिषदेची निवडणूक असो किंवा शिवसेनेतील बंडखोरी असो या सर्वच घडामोडींमागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात होता, असे म्हटले जाते. दरम्यान, सर्व सरप्राईज आता संपले आहेत. २०२४ साली अनेक सरप्राईजेस देऊ, असे फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या विधानानंतर आगामी काळात राज्यात कोणती राजकीय उलथापालथ होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांन भाष्य केले आहे. आम्हीच फडणवीसांना २०२४ साली अनेक सरप्राईजेस देऊ असे जयंत पाटील म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा >> अशोक चव्हाण यांची मुलगी खरंच राजकारणात सक्रिय होणार? खुद्द अशोक चव्हाण यांनीच दिलं उत्तर; म्हणाले, ” माझ्या मुलींना…”

Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Devendra Fadnavis Slams Rahul Gandhi in Chandrapur Rally Speech
“त्या नादान राहुल गांधींना जाऊन सांगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत…”, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे काम केले जाईल

आता सर्व सरप्राईज संपलेले आहेत. आता २०२४ साली सरप्राईज असतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावरच जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. “२०२४ साली लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होईल, असे मी गृहीत धरलेले आहे. हे गृहीत धरूनच आम्ही कामाला लागलो आहोत. अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. त्यातून आगामी काळातील चित्र निराशाजनक नसेल. २०२४ साली सकारात्मक विचार करून महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे काम केले जाईल. लोक फार हुशार असतात. आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे २०२४ साली आमचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राईज असेल,” अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.

हेही वाचा >> “त्यांना माझ्यासमोर आणा, मी..,” अभद्र भाषेत बोलणाऱ्या नेत्यांवर राज ठाकरे संतापले; म्हणाले, “…तर बोलण्याची हिंमत होणार नाही”

…तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते

“जे जाणारे असतात ते कधीच कोणाचेही नसतात. त्यामुळे त्यांच्या मागे लागायचे नसते. लोक येतात आणि जातात. जे ठाम असतात तेच आपले असतात. कोण कच्चं आहे, कोण पक्कं आहे याबाबत आपल्याला माहिती असते. जोपर्यंत आपल्यात नवी माणसं निवडून आणण्याची ताकद असते तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते. निवडणूक जवळ आल्यानंतर काही लोक येतील तर काही लोक जातील,” असेही जयंत पाटील म्हणाले.