सोलापूर : महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा वापरून रोज नवनवे प्रश्न करून अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत. त्यातून महाराष्ट्र समाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या अडचणीत आणले तरी भविष्यात हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> Breaking: अखेर शरद पवार गटाला नाव मिळालं, ‘या’ नावावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब!

pm narendra modi slams congress over vote jihad allegations
‘व्होट जिहाद’चा काँग्रेसचा डाव! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघाती आरोप
Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar
राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
BJP confused by Prime Minister Narendra Modi appeal regarding Shiv Sena NCP
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सारेच संभ्रमात; नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने ‘रालोआ’त यावे!
Complaint of NCP to Election Commission against Ravindra Dhangekars campaign
रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात ‘घड्याळ’; राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
Nana Patole, Sharad Pawar
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं भाष्य; म्हणाले, “अनेक पक्षांचा…”
Emotional Post For Sharad Pawar
शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भावूक पोस्ट “साहेब आम्ही खिंड लढवतो, तुम्ही..”
rohit pawar replied to narendra modi
“महाराष्ट्रात येऊन त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले, आता ४ जूननंतर…”; रोहित पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

माढा लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी दौरा करून टेंभुर्णी (ता. माढा ) येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कणाहीन निवडणूक आयोगाकडून न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्वादी काँग्रेस पक्ष आहे. देशातील विविध २८ राज्यांत हा पक्ष विखुरला आहे. त्यापैकी २३ राज्यांतील पक्ष प्रमुखांनी शरद पवार यांच्याच नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. परंतु ही वस्तुस्थिती असताना निवडणूक आयोगाने केवळ महाराष्ट्र विधिमंडळातील बहुसंख्य सदस्य एका बाजूने गेले म्हणून हा चुकीचा निर्णय दिला आहे,असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा >>> “घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना….”, लेखक अरविंद जगताप यांची सूचक पोस्ट चर्चेत

माढा मतदारसंघात शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या महिलांना धमक्या दिल्या जातात. परंतु कोणी कितीही त्रास दिला तरी उज्ज्वल भविष्यकाळ आमचाच आहे. पक्ष आणि चिन्ह पळविले गेले. परंतु शरद पवार यांच्यावर असलेले सामान्य माणसाचे प्रेम कोणीही हिरावून नेणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. माढा भागासह सोलापूर जिल्ह्यात अभिजित पाटील यांच्यासारख्या नेत्यालाही शरद पवारांची साथ सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. बंद पडलेला साखर कारखाना त्यांनी चालवायला घेतला आणि उत्तमप्रकारे चालवून दाखविला आहे.  एवढेच नव्हे तर शेतक-यांच्या उसाला  चांगला भाव देऊन माढा भागात ऊस  दराची स्पर्धा लावली आहे. परंतु अभिजित पाटील यांच्यावर केवळ राजकीय दबावातून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र शिखर बँकेकडून जाणीवपूर्वक कारवाई करून त्यांना त्रास दिला जात असला तरी न्यायालयीन लढाईत ते यशस्वी होतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.