scorecardresearch

मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देता? जयंत पाटलांच्या खोचक प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही चांगलंच धारेवर धरलेलं दिसत आहे.

मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देता? जयंत पाटलांच्या खोचक प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले…
राहुल नार्वेकर व जयंत पाटील

महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही चांगलंच धारेवर धरलेलं दिसत आहे. बुधवारी (२४ ऑगस्ट) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव लवकर चर्चेसाठी घेण्याची मागणी केली. यावर नार्वेकरांनी तुमचं समाधान होईल असं उत्तर घेऊ, असं उत्तर दिलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटलांनी आक्षेप घेत खोचक प्रश्न विचारला. याची सध्या जोरदार चर्चा आहे.

जयंत पाटील म्हणाले, “अध्यक्ष महोदय आपल्याबद्दल मला आदरच आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मात्र, मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देत आहात?”

जयंत पाटलांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “मी महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून अशी हमी देतो की मंत्र्यांकडून तुमचं समाधान होईपर्यंत उत्तर घेऊन.”

हेही वाचा : “जयंतराव असं का करता, मी अख्खा मुख्यमंत्री…”, एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, “तुम्ही समाधान होईपर्यंत मंत्र्यांकडून उत्तर घेऊन असं म्हटलं पाहिजे. तुम्ही मंत्र्यांना दम देऊन उत्तर द्यायला सांगितलं पाहिजे. त्यांना दमात ठेवा.” यावर नार्वेकरांनी तुमचं समाधान होईल अशी उत्तरं घेऊ म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil question assembly president rahul narvekar over ministers answer pbs