भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पडळकर यांनी एका व्हिडीओतून माझ्यावर हल्ला करण्यामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग होता असा आरोप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ ७ नोव्हेंबर रोजीचा असल्याचा दावा केला आहे. आटपाडी पोलीस स्टेशनच्या जवळून जात असताना माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. हा हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने २०० ते ३०० लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

जमावाकडनं हल्ला करण्याचा सुनियोजित कट – गोपीचंद पडळकर

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक

“७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर हल्ला करण्यात आला. आटपाडी पोलीस स्टेशनच्या समोर हा हल्ला झाला. हा हल्ला सुनियोजितपणे करण्यात आला होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा आणि मग जमावाकडनं हल्ला करून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

जयंत पाटील आणि पोलीस अधिक्षकांवर गंभीर आरोप

“आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना पाहायला मिळत आहे. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला गेला आणि सदर घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरणात मग्न होते. या हल्ल्याच्या कटात जिल्हायाचे पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला,” असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

“पोलीस अधिक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? पण एकच सांगतो मी माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा चालूच ठेवणार आहे,” असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.