करोनाविषयक जारी असलेली नियमावली आणि रात्री दहानंतर सार्वजनिक ठिकाणी जाहीर सभा, बैठक घेण्यास आणि ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करण्यास बंदी असतानाही हे नियम धाब्यावर बसवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सोलापुरात मध्यरात्रीनंतर जाहीर सभा व बैठकांचा फड रंगला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी संयोजकांसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पुणे रस्त्यावर बाळे येथे जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा रात्री आठ वाजता राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश आयोजित केला होता. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तेथे पोहचायला रात्रीचे बारा वाजले. तरीही त्यांची वाट पाहत पोलिसांसह कार्यकर्ते व नागरिक तिष्ठत थांबले होते. पाटील मध्यरात्रीनंतर आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत भाजपचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांच्यासह माजी नगरसेवक सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, किशोर पाटील, सुनील पाटील, हर्षल प्रधाने अमोल धंगेकर, मारूती तोडकरी आदींचे स्वागत करून या सर्वांना राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश देण्यात आला. यावेळी शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

हेही वाचा – सोलापुरातील राजकीय प्रवेशाची राज्यात चर्चा; रात्री १२ वाजता भाजपा नेत्याचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

एकीकडे करोनाविषयक नियमावलींचे उल्लंघन तर दुसरीकडे रात्री दहानंतर सार्वजनिक ठिकाणी सभा, संमेलने व बैठका घेणे आणि त्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करून ध्वनी प्रदूषण निर्माण करण्यास कायदेशीर बंदी आहे. परंतु या नियमांचे उल्लंघन करून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा तथा जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. करोना निर्बंध असल्यामुळे विवाह सोहळे, मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी न करण्याच्या सूचना आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळींवर गुन्हेही दाखल होत आहेत. परंतु जबाबदार मंत्री आणि प्रमुख पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांना मध्यरात्रीनंतरही नियम धाब्यावर बसवून जाहीर सभा घेता आली.

आणखी वाचा – राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांकडून रात्री १२ वाजता भाजपाचा करेक्ट कार्यक्रम

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी कायद्याचे उल्लंघन करून जाहीर सभा आयोजित केल्याबद्दल संयोजक बिज्जू प्रधाने यांच्यासह सहाजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जयंत पाटील व इतर नेत्यांना वगळण्यात आले आहे.