scorecardresearch

Premium

“…तर पळून जाऊन लग्न करा”, जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली होती. यावर जयंत पाटलांनी भाष्य केलं आहे.

jayant patil prakash ambedkar
जयंत पाटील प्रकाश आंबेडकर यांच्यावर बोलले आहेत. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’ आघाडीतील समावेश अद्याप अधांतरीच आहे. तसेच, वंचित आघाडी आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांची युती झाली आहे. पण, महाविकास आघाडीत अद्याप वंचित आघाडीला सामावून घेतलं नाही. यामुळे वंचितला शिवसेनेबरोबर जागा वाटप करण्यात अडचणी येत आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली होती.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघाली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत, तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावं लागत आहे,” असं टीकास्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं होतं.

congress not get proposal from Prakash Ambedkar says mp kumar ketkar
“ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला प्रस्तावच नाही,” खासदार कुमार केतकर यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…
akola Adv Prakash Ambedkar advice Uddhav Thackeray
“भाजपच शिवसेना ठाकरे गट चालवतो…”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ
Prakash Ambedkar on BJP MP Congress
“संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल, म्हणाले…
prakash ambedkar on bjp and rss
“भाजपा-आरएसएसकडून मुस्लीम-दलितांचा नरसंहार घडवण्याचा कट”, प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान

हेही वाचा : “ठाकरे पिता-पुत्र झोपेत…”, ‘त्या’ प्रकरणावरून भाजपा नेत्याची टीका

“आम्हाला कुणाचही वावडं नाही”

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचा खोचक टोला लगावला आहे. “दोघांच्या लग्नाला भटजी अडचण करत असेल, तर पळून जाऊन लग्न करणे हाच पर्याय आहे. आम्हाला कुणाचही वावडं नाही. भाजपाच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी निर्माण झाली आहे. आघाडीत सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत नेत्यांनी केलं आहे. आघाडीत आल्यानंतर धोरणानुसार काम केलं पाहिजे.”

हेही वाचा : “निवडणुका लढणार नाही, पण…”, योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केली भूमिका

“सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका”

“महाराष्ट्रात सर्वजण एकत्रित आले, तर निश्चित फायदा होईल. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सकारात्मक असेल, स्वागत करतो. सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कुणाला टाळणं ही आमची आणि काँग्रेसची भूमिका नाही,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil taunt prakash ambedkar over shivsena alliance ssa

First published on: 03-10-2023 at 12:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×